भारत निवडणूक आयोगाने तयार केले सी-व्हिजिल
भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल नावाचे अँप तयार केले आहे, ज्याद्वारे निवडणूक लढविणारे उमेदवार आणि समर्थक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना सहज पकडले जाईल.
आता निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन करणे आता सोपे नसणार कारण आता – तंत्रज्ञानाच्या मदतीने नियम मोडणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने सी-व्हिसल अँप तयार केले आहेत, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास मुख्यत:निवडणूक लढविणारे उमेदवार आणि समर्थक सहज पकडले जाऊ शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी काही अँप तयार करण्यात आले असून, ही माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. म्हणजेच नेत्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जावे लागणार नाही.
निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि निवडणूक निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग अनेक आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करीत आहे आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकांच्या सोयीसाठी आता अँड्रॉइड फोनमध्ये ‘सी-व्हिजिल’ अँप विकसित केले आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती मिळण्यास उशीर होत असल्याने गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तसेच फोटो किंवा व्हिडिओ व्यतिरिक्त अशा पुराव्याशिवाय तक्रारींची पडताळणी करणे अवघड आहे. बहुतांश तक्रारी खोट्या असल्याचे आढळून आले आहे
निवडणूक आयोगाने म्हटले आहे कि, परंतु आता ‘सी-व्हिजिल’ अँपच्या मदतीने आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये उणीव भरून निघेल, जेणेकरून तक्रारींची तातडीने निवारण करता येईल, आणि आचारसंहिता उल्लंघनाचा थेट अहवाल पाठवू शकता.
नोंदणीकृत अहवाल असल्यास, संबंधित व्यक्तीला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जारी केला जाईल, जेणेकरून तो त्याच्या प्रकरणाची स्थिती ट्रॅक करू शकेल. निनावी तक्रारींना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाणार नाही. ‘सी-व्हिजिल’ प्रणालीत तक्रार मंजूर झाल्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविण्यात येईल, ते फिरत्या भरारी पथकाला कारवाईचे निर्देश देतील.
आता निवडणुका होणार असून निवडणूक आयोग राष्ट्रीय तक्रार तक्रार सेवा, एकात्मिक संपर्क केंद्र, सुविधा, सुगम, इलेक्शन मॉनिटरिंग डॅशबोर्ड आणि वन वे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सारख्याअँप्सचा वापर करेल. आयोगाने म्हटले आहे की, ‘सुविधा’ ही एक खिडकी प्रणाली आहे, जी 24 तासांच्या आत निवडणुकीशी संबंधित परवानगी किंवा मंजुरी प्रदान करते. जाहीर सभा, उमेदवार आणि राजकीय पक्षांना या यंत्रणेच्या माध्यमातून सभा, आरसे लावणे, गाड्या घेणे, तात्पुरती निवडणूक कार्यालये उभारणे आणि एकाच ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्याची मुभा देण्यात येणार आहे.
निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सी व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिक आक्षेपार्ह छायाचित्र वा चित्रफित या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग वा तत्सम गैरप्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी सी – व्हिजिल ॲप विकसित करण्यात आलेले आहे.
अँप अधिक सक्षम कसे आहे याचा दुरुपयोग का करता येत नाही …
- फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ‘सी-व्हिजिल’ वापरकर्त्यास केवळ 5 मिनिटांचा अवधी मिळेल.
- हे अँप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी देत नाही.
- अँपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतन करता येत नाही.
- एकसारख्या तक्रारीच्या दरम्यान किमान 5 मिनिटांचा विलंब करावा लागतो.
- ‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जातो .
स्मार्टफोनवरून या अँपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येते . यानुसार खालील पद्धतीने तक्रारिंवर कारवाई होते
१. आचारसंहिता भंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांने संबंधित घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. जी.पी.एस.द्वारे स्वयंचलीत स्थान मॅपिंगसह अँपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर केलेल्या तक्रारीचा मेसेज द्वारे युनिक आयडी प्राप्त होतो. प्रत्येक तक्रारींसाठी एक आयडी मिळतो . तसेच अँप वापरनाऱ्यास ‘सी-व्हिजिल’ अँपवर आपली ओळख लपवून देखील तक्रार नोंदविण्याचा पर्याय दिलेला आहे. यात वापरकर्त्याच्या मोबाइल नंबर आणि इतर प्रोफाइल माहिती अँप प्रणालीवर पाठवले जात नाहीत त्यामुळे निनावी तक्रारींना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जात नाही. त्याच्या तक्रारीवर कारवाई ही होणार असली तरी निनावी तक्रारीच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास त्याच्या प्रकरणाची स्थिती ट्रॅक करता येत नाही .
२.तक्रारकर्त्याने तक्रार नोंदविल्यानंतर ती पाच मिनीटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्यानंतर ती तक्रार तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे पाठविण्यात येईल. त्या नुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या ‘जीव्हीआयजीआयएल अन्वेषक’ नामक जीआयएस-आधारित मोबाइल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ते संबंधित पथक घटनास्थळावर पोहोचाल. त्यानंतर संबंधित तक्रारी बाबत तपास व तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्याचा अहवाल निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवतील. हा एकूण कालावधी ३० मिनिटांचा असेल
३.भरारी पथकाने अहवाल संबंधित निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्यावर, त्या घटनेतील तथ्य, पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणुक निर्णय अधिकारी ती तक्रार फेटाळण्याची अथवा , निकाली काढावयाची की पुढे पाठवायचे याचा निर्णय घेतील. जर त्या तक्रारीत तथ्य अढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला मोबाईलवर संदेशाने प्राप्त होईल.
‘सी-व्हिजिल’ वर खालील कारणांसाठी तक्रार करता येईल - मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात.
- पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी.
- मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे.
- मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर.
- उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर.
- जमावाला चिथावणीखोर भाषण देणे.
-मतदारांना पैसा, मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप. - शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर.
सी-व्हिजिल’वरील नोंदविलेली तक्रार योग्य असल्यास काय कारवाई होईल - कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार.
- कारवाईतील मद्य अथवा आमली पदार्थ जप्त होणार.
- संबंधितांवर एफआयआर नोंदवला जाईल.
- संबंधितांवर गुन्हेगारी कारवाई होणार.
लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे