पोलीस स्मृतिदिन संचलन २१ ऑक्टोबर २०२४ शोक कवायत
पुणे-मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना, वीरमरण आले, अशा संपुर्ण भारत देशातील सर्व राज्य, केंद्रातील निमलष्करी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार / जवान यांचे स्मृतिला आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०७/३० वा.ते ०९/०० वा.चे दरम्यान पाषाण रोड स्थित महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
लडाख येथे दि.२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी, सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्व तयारी निशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या १० शुर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो. पोलीस स्मृतिदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते.
आज महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधनकेंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी ०८/०० वा. श्री. दत्ता पडसलगीकर मानद संचालक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी पुणे व माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य तसेच श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड, पुणे, दीपक पाण्डये अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे,सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, शशीकांत महावरकर पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अप्पर आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे, अरविंद चावरिया अप्पर पोलीस आयुक्त, प्रशासन पुणे शहर, शैलेश बलकवड अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, अतुल पाटील पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पंकज देशमुख पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, तुषार दोशी पोलीस अधिक्षक, पुणे लोहमार्ग व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी (तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कृष्णन, नारायण स्वामी, चंद्रशेखर दैठणकर, मकरंद रानडे, रामराव वाघ, मानगावकर, प्रकाश मुत्याळ, श्री. शेषराव सुर्यवंशी, प्रभाकर ढमाले, राम मांडुरके, आर.एस. खैरे, सी.जी. कुंभार, अरुण वालतुरे, जाफरभाई शेख, सुनिल देशमुख, राम पठारे असे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवर, पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
दि.१ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील १. पोलीस उप निरीक्षक प्रकाश नाना शिंदे २. पोलीस कॉन्सटेबल राहूल गोपीचंद पवार ३. पोलीस कॉन्सटेबल वैभव सुनिल वाघ असे ०३ पोलीस जवान कर्तव्यावर असताना शहिद झाले.
या प्रसंगी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. शोक कवायतीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालया कडील एक प्लाटुन, पुणे ग्रामीण कडील एक प्लाटुन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया कडील एक प्लाटुन, पुणे लोहमार्ग कडील एक प्लाटुन व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ व २ यांचेकडील प्रत्येकी एक प्लाटुन अशा एकुण ०६ प्लाटुन मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तसेच बॅण्ड पथका मध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण यांचे कडील वाद्य-वृंदांनी भाग घेतला होता. परेड कमांडर, राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय, पुणे शहर दशरथ हटकर, व सेकंड परेड कमांडर, राखीव पोलीस उप-निरीक्षक, मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे संजय जाधव यांनी परेड कवायतीचे नेतृत्व केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, बिनतारी संदेश विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, मोटार परिवहन विभाग पुणे, विविध शाखा या विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, पोलीस दवाखाना वैद्यकीय स्टाफ यांचेसह हजर होते.
दि.१ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आपले कर्तव्य बजावित असताना, वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकुण २१४ जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायत्तीचे दरम्यान नंदिनी वाग्याणी सहा. पोलीस आयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर व अनुजा देशमाने सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालनसिताराम नरके, सेवानिवृत्त, सहा. पो. फौज. एसआरपीएफ, ग्रुप, रामटेकडी, पुणे व दत्तात्रय निकम, पोलीस अंमलदार, पिंपरी पो.स्टे. यांनी केले.