पुणे- जनतेचा. ज्येष्ठांचा आशिर्वाद ,भाजपा नेत्यांच्या शुभेच्छा यामुळेच भाजपने मला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे उमेदवारी हा देखील मी माझा सन्मान मानतो त्यामुळे या दोहोंच्या विश्वासाला मी कधी तडा जाईल असे काहीही करणार नाही त्यांचा विश्वास जपण्याचे काम करून त्यांचे जीवनमान कसे सुरळीत राहून उंचावेल या साठी प्रयत्न करत राहील असे सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटले आहे.भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत शिरोळे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले कि , पुण्याच्या छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा मनापासून आभारी आहे. शिवाजीनगरच्या रहिवाश्यांचा आशीर्वाद व पाठींबा, तसेच गेल्या ५ वर्षात माझ्या कार्यसमुहाने दिलेल्या सातत्यपूर्ण सेवेमुळे मला शिवाजीनगर मतदार संघाचे मतदार पुन्हा एकदा आर्शिवाद देवून त्यांचे प्रतिनिधित्व करण्यास विधानसभेत पाठवतील असा मला विश्वास आहे.