पुणे: भारतीय नौदलाने भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी आज भारतातील अग्रगण्य खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक बजाज अलायन्झ लाइफ कंपनीसोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. या सहयोगाचा भाग म्हणून बजाज अलायन्झ लाइफ किफायतशीर दरात सर्वसमावेशक संरक्षण सुनिश्चित करत विविध प्रकारची जीवन विमा उत्पादने सादर करेल.
‘नौदल नागरी वर्षा’ साठीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून असलेले महत्व नमूद करताना व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला, चीफ ऑफ पर्सोनेल यांनी बजाज अलायन्झ लाइफने विशेषकरून भारतीय नौदल नागरी कर्मचाऱ्यांच्या गरजांना लक्षात घेऊन रचना करण्यात आलेल्या जीवन विमा उपाय सुविधांची प्रशंसा केली.
बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुघ म्हणाले, “भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना जीवन विमा सेवा प्रदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल बजाज अलायन्झ लाइफमधील आम्हा सर्वांसाठी हे खरोखरच अभिमानाचे क्षण आहेत. भारतीय नौदलाच्या 2024 ‘नौदल नागरी वर्षा’ च्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, आम्ही नौदल नागरी कर्मचाऱ्यांसाठी आमच्या सेवा सुरू करणार आहोत. मला विश्वास आहे की हे अनेक भारतीयांसाठी जीवन विम्याचे फायदे मिळवण्याच्या दिशेने मोठे पाऊल असेल. आम्ही आपल्या देशातील विमा सुविधा घेण्यामध्ये असलेली दरी भरून काढण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. आम्ही भारतीय नौदलासाठी सर्वोत्तम आणि अत्यंत सुलभ विनाअडथळा उपाय सुविधा देण्याचे सुनिश्चित करू.”
या भागीदारी अंतर्गत बजाज अलायन्झ लाइफ भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांच्या विविध जीवन उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी विविध जीवन विमा उत्पादनांची श्रेणी सादर करणार आहे. भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांना टर्म इनश्युरन्स आणि आपली जीवन उद्दिष्टे सुरक्षित करण्यासाठी पुरेसे जीवन विमा संरक्षण यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शैक्षणिक सेमिनार आणि सत्रांचे आयोजन केले जाईल. कंपनी नौदल नागरी कर्मचाऱ्यांच्या विशेष गरजांना अनुसरून विशिष्ट प्रक्रिया देखील सुरू करेल.
नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांना विमा पुरविण्यासाठी भारतीय नौदलाने व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला, चीफ ऑफ पर्सोनेल आणि भारतीय नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीसोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. यावेळी बजाज अलायन्झ लाइफचे प्रॉप्रायटरी सेल्स फोर्सचे मुख्य वितरण अधिकारी श्री. अमित जयस्वाल आणि टीम मधील इतर सदस्य उपस्थित होते.

