पुणे दि. 10 ऑक्टोबर: जिल्हा परिषद, मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडुंनी चमकदार कामगिरी केली. क्युरोगी या प्रकारात खेळाडूंनी प्रतिभेचे दर्शन घडवत २ सुवर्णपदक व ३ रौप्य पदकांची कमाई केली. . तायक्वांदो स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी केवळ तांत्रिक क्षमताच नाही, तर खेळाप्रती त्यांची अतूट बांधिलकीही दाखवली. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून प्रेक्षकांनी हजेरी लावी.
35 किलो वजनाखालील मुलींमध्ये सानवी गिरी(सुवर्णपदक), 38 किलो वजनाखालील मुलींमध्ये आरना यादव (सुवर्णपदक) आणि 38 किलो वजनावरील मुलींमध्ये निधी कुटे (रौप्य पदक) मिळाले आहे.
तसेच 41 किलो वजनाखालील मुलांमध्ये आरव कुमार आणि 32 किलो वजनाखालील मुलांमध्ये वीर शर्मा (रौप्य पदक) मिळाले.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंच्या यशाबद्दल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
प्रशिक्षक कोमल पाठारे घारे (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त) यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले असून, या कामगिरीतून त्यांचे कठोर परिश्रम आणि चिकाटी दिसून येते.
तायक्वांदो स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी,2 सुवर्णपदक व 3 रौप्य पदक
Date:

