वसतिगृहात अल्पसंख्यांक मुलींच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात
पुणे, दि.९ : शासकीय तंत्रनिकेतन पुणे, येथील अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतिगृहात कंत्राटी पद्धतीने नोंदणीकृत सेवा पुरवठादारांकडून अधीक्षक, लिपिक, शिपाई, सफाईगार व पहारेकरी (वॉचमॅन) या पदांच्या भरतीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक पुरवठादारांनी निविदा अणूविद्युत व दूरसंचार विभाग, शासकीय तंत्रनिकेतन पुणे, येथे २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर कराव्यात.
अल्पसंख्यांक वसतिगृह योजनेंतर्गत या समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या (मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, ज्यू व पारशी) विद्यार्थिनींसाठी भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथे वसतिगृह सुरू करण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया सुरूवात करण्यात आली आहे.
मुलींच्या प्रवेशासाठीचा अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे व निवडीचे निकष www.gppune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाचे पूर्ण भरलेले अर्ज योग्य कागदपत्रांसह २४ ऑक्टोबर पर्यंत अणुविद्युत व दुरसंचार विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे जमा करून अधिक माहितीसाठी ९९२२२७९४७४ या क्रमांकावर संपर्क करावा. सेवा पुरवठादार यांच्यासाठी निविदांसाठीचे विहित नमुन्यातील अर्ज व इतर प्रपत्रे शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे उपलब्ध आहेत, असे तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा सदस्य सचिव अल्पसंख्यांक वसतिगृह डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले.
0000

