३०वा पुणे नवरात्रौ महोत्सव
पुणे-गुलाबी आँखे…, ओ मेरे दिल के चैन…, प्यार दिवाना होता है.., क्या हुवा तेरा वादा, कहना ही क्या... या गीतांसह ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन व अजय-अतुल यांचे हिट्स गीते गायकांनी सादर करून श्रोत्यांची वन्समोरची दाद मिळवली.३०व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महोत्सवात गायक मुकेश देढीया, गणेश मोरे, तेजस्विनी पाहूजा, मकरंद पाटणकर, चारूलता पाटणकर, धनंजय पवार यांनी आपल्या सुरेल गायनातून श्रोत्यांची मने जिंकली.
मुकेश देढीया प्रस्तुत भव्य वाद्य वृंदासहित ‘ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन व अजय-अतुल ‘ यांच्या हिट्स गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गायकांनी सादर केलेल्या गीतांच्या सुरात सूर मिसळून तर वादकांच्या ठेक्यावर नृत्य करण्याचा मोह श्रोत्यांना आवरला नाही.
कार्यक्रमाची सुरुवात अंबे मातेला नमन करणाऱ्या ‘घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार’, ‘आलो दुरून रांगून डोंगर येंगून’, ‘उघड देवी दार…’ या गाण्यांनी झाली. जी’व गुंगला दंगला असा’ यासह प्रेम गीते सादर करण्यात आली.
अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली प्रसिद्ध गीते गायकांनी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. ‘सामने ये कौन’, ‘तन्हाईया’, ‘रंग रंगीला’, ‘दिल है छोटासा’, ‘ये हसीन वादिया’, ‘ये शाम मस्तानी’, ‘प्यार दीवाना होता है’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘दम मारो दम’, ‘छय्या छय्या’, ‘बचना हैं हसीनो’, ‘दुनिया मे लोगो को’, ‘मुकाबला’ ही गाणी सादर करून श्रोत्यांच्या टाळ्यांची दाद मिळवली.
कार्यक्रमाला भव्य वाद्य वृंदाची साथ लाभली. रोहित साने -तबला, केदार मोरे – ढोलकी, सोमनाथ हटके- तुंबा, अभिजित भदे – रिदम मशीन, आनंद घोगरे- ड्रम, सचिन वाघमारे- फ्लूट, विजय मूर्ती – गिटार, असिफ खान – ट्रंपेट व अमन सय्यद यांनी कीबोर्ड वर साथसंगत केली.
नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी गायक व कलाकारांचा व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी महोत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.