म्हणाल्या – सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का?
पुणे–ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा करत माजी आमदार महादेव बाबर यांना उमेदवारी देखील जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप पूर्णपणे ठरले नाही. त्यात हडपसर जागेचा पेच देखील सुटला नाही. मात्र त्याआधीच सुषमा अंधारे यांनी उमेदवारी जाहीर केली. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली असून सुषमाताई त्या बैठकीत होत्या का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
सुषमा अंधारे यांनी हडपसर मतदारसंघातून महादेव बाबर यांना उमेदवारी जाहीर केल्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. त्यावर सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का? असा सवाल सुळे यांनी केला. माझ्या माहितीनुसार काल झालेल्या बैठकीत त्या उपस्थित नव्हत्या. तरी मी त्यांना एकदा फोन करुन विचारेन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अंधारे यांना लगावला आहे. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, मी एक जबाबदार खासदार आहे. जागावाटप फायनल होईपर्यंत मी आऊट ऑफ लाईन बोलणार नाही. महाविकास आघाडीत गैरसमज होईल, असे वक्तव्य मी करणार नाही, असेही सुळे म्हणाल्या.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे
सुषमा अंधारे काल एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, हडपसर हा मतदारसंघ आम्हाला सुटला असून या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणताही मनमुठाव नाही, सगळ्याच जागांवर एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लिअर झाली असून आता केवळ 15 ते 18 जागांवर चर्चा सुरू आहे.

