मुंबई, 7 ऑक्टोबर 2024 : ए.पी. मूलर – मर्स्क (मर्स्क) ही लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक इंटिग्रेटर कंपनी असून, आज भारतात त्यांच्या ‘इक्वल ॲट सी’ उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याची घोषणा कंपनीने केली. 2024 मध्ये ऑनबोर्ड केलेल्या 45% नॉटिकल आणि इंजिनीअरिंग कॅडेट्स महिला असल्याने, कंपनीने तिच्या कॅडेट प्रवेशामध्ये समान लिंग प्रतिनिधित्वाच्या 2027 च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
भारतीय सागरी क्षेत्रातील लैंगिक समानतेच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढविणे
2022 मध्ये सुरू झालेला ‘इक्वल ॲट सी’ उपक्रम भारतात उल्लेखनीय यश मिळवून तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. मर्स्क खलाशांमध्ये लैंगिक समानता प्राप्त करणे, खलाशांमध्ये महिलांचे ऐतिहासिक कमी प्रतिनिधित्वाच्या समस्येचा सामना करणे आणि लैंगिक विविधता सुधारण्यासाठी संपूर्ण भारतीय सागरी क्षेत्रासाठी एक परिसंस्था निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम संपूर्ण उद्योगातील विविध भागधारकांना एका समान व्यासपीठावर आणतो, जो विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी, उद्योगातील आव्हाने समजून घेण्यासाठी, एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धती लागू करण्यासाठी केंद्र म्हणून काम करतो.
डेन्मार्कचे भारतातील राजदूत महामहिम फ्रेडी स्वेन म्हणाले, “समुद्राला लिंग कळत नाही. सागरी कारकीर्दीतील विविधतेला चॅम्पियन करून, मर्स्क केवळ समानतेकडेच चालत नाही तर जहाजबांधणी उद्योगात नावीन्य आणि वाढीसाठी एक आदर्श तयार करत आहे. डेन्मार्क आणि भारत या दोन्ही सागरी राष्ट्रांनी या बदलाचे नेतृत्व केले पाहिजे. ते पुढे म्हणाले, “महिलांसाठी सागरी करिअरमध्ये अधिक संधी निर्माण करण्याचा हा उद्योग-व्यापी प्रयत्न निःसंशयपणे आमच्या जागतिक शिपिंग समुदायाला बळकट करेल आणि पुढील वर्षांमध्ये प्रगती आणि टिकाऊपणा वाढवेल.”
मर्स्कच्या मरीन पीपलचे प्रमुख, आशिया करण कोचर म्हणाले, “आमच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि उद्योगाकडून मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे समुद्रात महिलांच्या भरभराटीसाठी एक समान वातावरण निर्माण करण्याचे भविष्य लक्षात येऊ लागले आहे. आमच्या उपक्रमांद्वारे आम्ही भारतातील अधिकाधिक महिलांना करिअर म्हणून समुद्री प्रवास निवडण्यासाठी यशस्वीपणे प्रेरित केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मर्स्क आणि संपूर्ण उद्योगात महिलांची संख्या 45% पर्यंत पोहोचणे हा एक चांगला सांघिक प्रयत्न आहे आणि आता हीच वेळ आहे की, भरती केलेल्या महिलांनाही ताफ्यात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.”
मुंबईत आज झालेल्या ‘इक्वल ॲट सी’ परिषदेने लिंग विविधता आणि समावेशावर चर्चा करण्यासाठी सागरी उद्योगातील लीडर्सना एकत्र आणले. महामहिम फ्रेडी स्वान, भारतातील डॅनिश राजदूत यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. परिषदेत तीन प्रमुख विभागांचा समावेश होता: सस्टेनेबल इक्वॅलिटी : गोइंग बियाँड दी ऑन बोर्डिंग – यातून परस्परसंवादी चर्चेद्वारे कार्यस्थळ संस्कृती आणि छळवणूक शोधली; सी-साइड चॅट – नॉट ऑल सीलिंग्स आर मेड ऑफ ग्लास – यात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांची एट्री याविषयी चर्चा झाली, याशिवाय ऑल वुमन ऑन बोर्ड : मिथ अँड रिअॅल्टी याविषयीही सविस्तर चर्चा झाली. सर्वसमावेशक सागरी उद्योगाला चालना देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करून, मर्स्कच्या विविधतेच्या उपक्रमांवरील प्रगती अहवालाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
भारतातील प्रमुख उपलब्धी आणि टप्पे
- भारतीय महिला नाविक : अलीकडील कॅडेट समावेशांसह, भारतीय महिला खलाशांची संख्या 2021 मध्ये केवळ 41 वरून 350 चा आकडा ओलांडली आहे, ज्याने भारतातील मर्स्कच्या नाविक लोकसंख्येतील विविधता सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
- समुद्री आणि अभियांत्रिकी प्रवाहात प्रगती: या वर्षीच्या प्रवेशातील महिला कॅडेट्सची एकूण टक्केवारी 45% वर गेली आहे आणि नॉटिकल विभागात आधीच 50% ओलांडली आहे.
- महिला रेटिंग कार्यक्रम: 2023 मध्ये ‘इक्वल ॲट सी’ या उपकार्यक्रमाच्या रूपात सुरू झालेल्या या उपक्रमाची सुरुवात भारतातील 22 महिला प्रशिक्षणार्थींनी केली. त्याच्या यशावर आधारित मर्स्कने त्यानंतरच्या दोन अतिरिक्त बॅचेस जोडल्या व आता एकूण 70 महिला रेटिंग प्रशिक्षण घेत आहेत.
जागतिक प्रभाव
भारतातील ‘इक्वल ॲट सी’ उपक्रमाच्या यशाने लिंग विविधता सुधारण्यात मर्स्कच्या जागतिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मर्स्कच्या ताफ्यातील महिला खलाशांची संख्या 2021 मध्ये 295 वरून 650 हून अधिक झाली आहे आणि 2024 मध्ये मोजली जात आहे. मर्स्कच्या जागतिक खलाश पूलमधील महिलांची टक्केवारी 2022 मध्ये 2.3% वरून 2024 मध्ये 5.5% झाली आहे.

