पुणे-तुम्ही खुनी आहात. रक्त बदलण्याचं पाप तुम्ही केलं. असा थेट आरोप करत पुण्यातील पोर्शे कार अपघातावरून खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर थेट टीका केली आहे.लोहगाव येथील श्री संत तुकाराम महाराज चौक येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या .
त्या म्हणाल्या ,’ तुमच्या दोन्ही हातावर खून आहे. पोर्शे कार आहे म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? असा प्रश्न उपस्थित करत जे दोन जीव गेले त्यांच्या आईचे अश्रू कोण पुसणार? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र तुमच्याकडे उत्तर मागतोय. मी तुमच्याकडं उत्तर मागत आहे. घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिरयाणी कोण घेऊन गेलं? ते पोलीस ठाणे आहे. तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही असंही सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. तसंच, त्या दोन जिवांच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या विरोधात प्रचार करणार आहे. अशी लोक वगडाव शेरीला लोकप्रतिनिधी हवे आहेत का ? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.