पुणे –
शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात संपन्न झालेल्या म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ४०० हून अधिक महिला यात सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेत तंबोला गायक आरती दीक्षित आणि आकाश सोळंकी यांनी बहरदार गीते सादर केली. आकर्षक नृत्येही सादर झाली. गाण्याच्या मुखड्याच्या ओळीतील शेवटच्या शब्दावर आधारित पुढचे गाणे असे या रंजकदार खेळामध्ये महिलांनी मोठा आनंद लुटला. वेजेत्यांना टी.व्ही, ओव्हन, शेगडी, मिक्सर इत्यादी बक्षिसांचे वाटप पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते देण्यात आली.