पुणे– भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरावर आज शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर ला सकाळी मोर्चा घेऊन येणार आहेत.तरी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुणे स्टेशन येथील अध्यक्षांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन काल कॉंग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी केल्यावर आज सकाळपासून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अरविंद शिंदे यांच्या घराबाहेर असा पहारा दिला …. दरम्यान चंद्रपूर येथे एका कॉंग्रेस पदाधिकाऱ्याने केलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार विरोधात आमदार माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण सतीश मिसाळ हे पुणे स्टेशन च्या आउट गेटवर आंदोलन करणार असल्याची माहिती व्हाटसअप वर फिरत होती या दोन्ही घटनांचा परस्पर संबध आहे किंवा नाही हे मात्र समजू शकलेले नाही.