पुणे, (दि.१ ऑक्टोंबर २०२४) : लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याने CM शिंदेंची तमाम महाराष्ट्रातील बहिणाई आनंदी झालेली असून महिलांनी सरकारच्या योजनांचा उत्सवच जणू अनुभवला आहे असे येथे शिवसेना नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान सध्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गो-हे यांच्यावर आहे. या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी या आठवड्यात विविध ठिकाणी गेल्या असता तेथील महिलांशी संवाद साधत सरकारच्या योजनांची माहिती व सरकार कडे त्यांचा असणाऱ्या अपेक्षा आदी अनेक महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा केली याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना भवन पुणे, येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुदर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार, जयश्री पलांडे, शैला पाचपुते, नेहा शिंदे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
त्या म्हणाल्या २८ सप्टेंबर रोजी खेड, राजगुरु नगर, चर्होली, आळंदी, मंदिर परिसर, येथे भेटी घेत लाडक्या बहिणी सोबत संवाद साधला. २९ सप्टेंबर रोजी भोर तालुक्यातील कापूरहोळ व धांगडवाडी येथे महाविजय संवाद मेळाव्यात संबोधित करून भोर तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथे २००० जनसमुदाय हजर होता, त्यात १००० महिला होत्या . ३० सप्टेंबर रोजी नारायण गावातील सफाई कर्मचारी वसाहत, शेलार विहार कॉलनी, आवटी मळा, वैदू वसाहत येथील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तसेच ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या त्यांच्या सोबत चर्चा साधत सरकारच्या वयोश्री, आरोग्य सहाय्यता निधी, युवक योजनांची माहिती देखील दिली. पिंपळवंडी तर जुन्नर शहर येथे आमदार शरद सोनवणे आयोजित १० हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित करून सरकार आपल्या पाठीशी आहे असा विश्वास उपस्थितांना दिला असल्याचे देखील त्यांनी सांगीतले. जागा वाटप बाबत विषयी बोलताना नीलमताई म्हणाल्या, जरी काही विरोधी पक्षाच्या वतीने काही मतदार संघात उमेदवार जाहीर केले असले तरी आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून मतदार जनते समोर जाणार आहोत. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य उमेदवार दिला जाईल. इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी महायुती म्हणून पुन्हा एकदा आमचे सरकार निवडून येईल यासाठी योग्य व्यक्तीला न्याय मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील. १९ लाख ६२ हजार ६६७ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यातील१९. लाख १४ हजार ५७९ लाभार्थी पात्र झाल्याचे माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुणे सांगितले
पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्या. पैकी आंबेगाव, बारामती ,भोर ,दौंड ,हवेली, इंदापूर ,जुन्नर ,खेड ,मावळ, मुळशी ,पुरंदर ,शिरूर, वेल्ला ,व पुणे शहर. या तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आले होते त्यापैकी पाच हजार अठरा अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले तर१३३२९ अर्ज कागदपत्रांच्या पूर्तते अभावी प्रलंबित आहेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या योजनेबाबत माहिती नीलमताई यांनी पुणे जिल्ह्यात फिरून प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संपर्क साधून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत मिळतो की नाही याची माहिती त्यांनी घेतली.
पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील. कोणत्या तालुक्यात किती अर्ज आले होते व किती पात्र ठरले यांची माहिती पुढील प्रमाणे आलेले अर्ज व कंसात दाखवलेले पात्र लाभार्थ्यांची संख्या;
आंबेगाव तालुका-६२७९५(६१७०२)
बारामती तालुका-१, १५,९७२(११३२६२)
भोर तालुका-५०, ५४५(४९६८४)
दौंड तालुका-९६, ३४३(९४२४६)
हवेली तालुका-४,१०, ६४२(४, ०३५५०)
इंदापूर तालुका-१, ०३९७४(१, ०२८३६)
जुन्नर तालुका-१, ००,६२९(९८७१९)
खेड तालुका-१, १२,५९८(१, १०१७७)
मावळ तालुका-९०, ७३१(८७७०५)
मुळशी तालुका-४४, ६७५(४३, ६६०)
पुरंदर तालुका-६४, ६४४(६३७९९)
शिरूर तालुका-१, ००१७८(९९१३४)
वेल्हा तालुका-१४, १२६(१३५३३)
पुणे शहर-५,९४, ७८५(५२७२७९)

