पितमपूर, १४ डिसेंबर २०२३ – भारतातील पहिल्या, देशांतर्गत बनवण्यात आलेल्या कापणी यंत्राचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वराज ट्रॅक्टर्स या महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या विभागाने भारतीय शेतकऱ्यांसाठी स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टरची आधुनिक आवृत्ती लाँच केली आहे. खरीप हंगामात लाँच करण्यात आलेल्या या कापणी यंत्रामुळे भात आणि सोयाबीनच्या कापणीवर चांगला परिणाम दिसून येत आहे. या कापणी यंत्राच्या यशस्वी पर्दापणानंतर कंपनीला आगामी रबी हंगामात चांगली मागणी मिळेल असा अंदाज आहे.
स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टर, स्वराजच्या मोहाली येथील आर अँड डी केंद्रात कित्येक वर्षांच्या तंत्रज्ञान विकासानंतर तयार करण्यात आला असून त्याला महिंद्रा अँड महिंद्राच्या फिनलँड, युरोप येथील हार्वेस्टर आर अँड डी केंद्राची मदत मिळाली आहे. कंपनीने कापणी यंत्रांना मिळत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन पितमपूर येथे कापणी यंत्राच्या उत्पादनासाठी खास प्लँट उभारला आहे. या प्लँटमध्ये सुट्या भागांच्या उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रणा, आधुनिक पेंट शॉप, खास जुळणी लाइन्स व चाचणीच्या सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध होत असलेली विविध वैशिष्ट्ये यात समाविष्ट करण्यात आली असून त्याचबरोबर टिकाऊपणा, दर्जेदार सेवा वेगवेगळ्या पिकांच्या गरजेनुसार इतर सुविधांसह स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टर कापणीसाठी सर्वसमावेशक उत्पादन बनले आहे. इंटेलिजंट हार्वेस्टिंग सिस्टीमच्या माध्यमातून यात दर्जेदार क्षमतांचा समावेश करण्यात आला आहे. कापणी झालेल्या एकरांची प्रत्यक्ष माहिती, लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग, प्रवास झालेले अंतर आणि वापरले गेलेले इंधन इत्यादी माहितीही त्यातून मिळते. स्वराजच्या इंटेलिजंट हार्वेस्टिंग सिस्टीममुळे ग्राहकाला अधिक चांगले निर्णय घेता येतात, कामकाजातील कार्यक्षमता तसेच नफा वाढवता येतो.
ताकद आणि टिकाऊपणाचा या ब्रँडचा वारसा पुढे नेण्यासाठी नव्या स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टरमध्ये कंपनीअंतर्गत विकसित आणि उत्पादित केलेले इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता देते तसेच ते पर्यावरणपूरक बीएसआयव्ही उत्सर्जन मापदंडानुसार बनवण्यात आले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या फार्म मशिनरी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख कैरास वखारिया म्हणाले, ‘स्वराजने भारतात कापणी तंत्रज्ञान रूजवण्यात मोलाची कामगिरी केली आहे आणि त्याच वारसाचा आधार घेत नवीन 8200 स्मार्ट हार्वेस्टर तंत्रज्ञानाचा नवा मापदंड प्रस्थापित करत बनवण्यात आले आहे. यातील बुद्धीमान कापणी यंत्रणेबरोबरच कंपनीची सेवा आणि सपोर्ट टीम कापणी यंत्राच्या कामगिरीवर २४x७ देखरेख करत असल्यामुळे ग्राहकाची मोठी मदत होते.’
कंपनीची ग्राहकसेवा नेहमीच्या सेवेपलीकडे जाणारी असून त्यात अलर्ट्स, वैयक्तिक गरजेनुसार सहकार्य, रिलेशनशीप व्यवस्थापक आणि अपवर आधारित व्हिडिओ कॉलिंग या सेवांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकाला तत्काळ सेवा मिळते. स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टर स्वराजच्या पॅन भारतातील ट्रॅक्टर वितरक नेटवर्कद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे.

