पुणे : उत्सव मित्र मंडळ,नवी पेठ यांच्याकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच श्रींची आरती कसबा-विश्रामबाग विभागाचे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बंडगर,आरोग्य निरीक्षक संतोष कदम ,मुकादम महादेव अडागळे, आरोग्य सेवक व सेविका,मंडळाचे हितचिंतक.भरत यादव,अतुल प्रधान यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.मंडळाकडून आरोग्य विभागाच्या ५ पुरुष कर्मचारी व ५ महिला कर्मचाऱ्यांना .भरत यादव व अतुल प्रधान यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर काळे अध्यक्ष अतुल धर्मे,सुमित काळे,विनय कदम,सचिन गायकवाड,तुषार सस्ते,सुनिल वाबळे,सुनिल पाटील,संदीप खराटे, विजय लोणकर,शैलेश कदम,आकाश खराटे,बाळासाहेब कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.’ज्यांचा सत्कार केला आहे ते सर्व घरचा उत्सव व सण विसरून संपूर्ण परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.त्यांच्या योगदानासाठी सामाजिक भावना मनात ठेवून सत्कार करण्यात आला आहे’,असे सुधीर काळे यांनी सांगितले
आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा उत्सव मित्र मंडळकडून सत्कार
Date:

