मोठ्या पवारांच्या मनात काय आहे? हे ओळखणे अवघड आहे. मात्र, अजित पवार यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे यांच्या मनात काय आहे, ते मला ओळखता येते व माहितीही आहे, आणि काय होणार आहे हेही ठाऊक आहे ; पण ते मी सांगणार नाही.
अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता कमी झाली असल्याचा दावा राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.त्यामुळे ते त्यांना आता तुम्ही थोडसं दुर ऊभं राहा म्हणू शकतील. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणुक लढवा असंही सांगतील अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.पाटील म्हणाले, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळं व्हावं वेगळं लढावं असं कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकतं. अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. निवडणुक झाल्यानंतर आपण परत बरोबर येऊ, असे सांगितले जाऊ शकते.
पुणे -आज मागणी नसलेल्या रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खर्च अनावश्यक सुरू आहे. पाण्याचे प्रश्न महत्वाचे असून राज्यात काही भागात पाणी कमी तर काही जागी जास्त आहे. अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे आवश्यक आहे. नाशिक, धुळे मधून काही पाणी गुजरातला जात आहे ते आपल्या हक्काचे आहे ते वळवले पाहिजे. सरकारने लक्ष्य देऊन विदर्भातील पाण्याचा प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ‘ महाराष्ट्र व्हिजन २०५० ‘ विषयावर वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.
प्रश्न- पवारसाहेबांनी त्यागाची भूमिका घेतल्याने अजितदादांनी बंडाची भूमिका घेतली काय ? उत्तर – नाही , तुम्ही बसून प्रश्न विचार .. तुम्ही उभे राहून प्रश्न विचारल्याने प्रश्न वाढलेला आहे .. असे म्हणत हसत जयंत पाटलांनी दिली बगल
जयंत पाटील म्हणाले, अलीकडे राजकारणी केवळ पुढील निवडणुकी पुरते पाहत आहे हे दिसून येत आहे. राज्यासमोर अनेक आव्हाने सध्या आहे. देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र अग्रेसर होते. रोजगारासाठी प्राधान्य काँग्रेस काळापासुन प्रोत्साहन दिले गेले. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र पूर्वी महत्वाचे स्थान होते पण आज अनेक ठिकाणी बंदरे, विमानतळे अशी दळणवळण सुविधा निर्माण झाली. त्यामुळे परिस्थिती बदलली असून गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय गुंतवणूकदारस निर्माण झाले.देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे महत्वाचे आहे. गुंतवणूक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी सर्व समाज गुण्या गोविंदाने राहिली पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिला पाहिजे तर गुंतवणूक येते पण सध्या तसे वातावरण नाही.
काहीजण धार्मिक गोष्टी बोलून भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन गुंतवणूक होणारी ठिकाणे निवडून तेथे रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले तर मोठ्या शहरावरील पायाभूत सुविधा ताण निर्माण होणार नाही. स्वतंत्र जागी ग्रोथ सेंटर, कॉरिडॉर निर्माण केले तर मराठवाडा, विदर्भ परिसरात नवे रोजगार निर्माण होऊन सदर भागाचा विकास होईल. धर्म निरपेक्ष संस्कार नवीन पिढीला दिले तर जागतिक पातळीवर आपण आगामी काळात पुढे जाऊ.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बाबत असंख्य शाळा निर्माण झाल्या आहे. आता त्याच्या शिक्षण आणि पायाभूत सुविधा बाबत गुणात्मक दर्जा संदर्भात विचार करणे गरजेचे आहे. शाळांच्या शिक्षकाचे प्रशिक्षण आणि दर्जा यातून चांगली पिढी निर्माण होईल. उद्याच्या निवडणुकीकडे केवळ न पाहता जनतेने दीर्घकालीन महाराष्ट्र हिताचा विचार निवडणुकीत करावा. तात्पुरते स्वप्न दाखवणारा योजना पेक्षा दीर्घकालीन परिणामकारक काम महत्वाचे आहे. सरसकट पैसे वाटप हे केवळ दोन महिने आहे. ज्या महिलेस पैशाची खरचं गरज आहे त्यांना मदत दिली पाहिजे. तात्कालिक स्वप्न दाखवणाऱ्या लोकांना जनतेने घरी पाठवले पाहिजे.