एमसीएच्या वतीने आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचे आयोजन

Date:

स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी एमसीएला मिळणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, पुणे केंद्राचे सहकार्य

पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२४ : पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या क्रिकेट स्टेडियमजवळ काही नवीन पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्ययावत सोयीसुविधा असलेले क्लब हाऊस उभारण्याकरीता एमसीएच्या वतीने आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए)च्या पुणे केंद्राच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची घोषणा एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए)च्या पुणे विभागाचे अध्यक्ष विकास अचलकर, आयआयएच्या कार्यकारी समितीचे सदस्य कपिल जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

व्यावसायिक वास्तुविशारद, व्यावसायिक वास्तुविशारद संस्था यांच्यासाठी ही स्पर्धा खुली असेल. तसेच या क्षेत्रातील तरुण पिढीला आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आर्किटेक्चर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेत स्वतंत्र विभाग असेल, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

एमसीएच्या वतीने आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट्स, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असलेली ही आर्किटेक्चरल डिझाईन आणि क्रिकेटची आवड यांची सांगड असलेली स्पर्धा इतर स्पर्धांच्या तुलनेत नाविन्यपूर्ण ठरणार आहे. या स्पर्धेमुळे जागतिक दर्जाच्या एका प्रकल्पात योगदान देण्याची महत्त्वपूर्ण संधी व्यावसायिक वास्तुविशारद व विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. राज्यातील क्रिकेट संबंधित इतर सुविधांसाठी ही स्पर्धा नवे मापदंड प्रस्थापित करेल असा माझा विश्वास आहे, असे पवार यांनी नमूद केले.

क्रिकेटला प्रोत्साहन देत असताना गहुंजे येथील स्टेडियममध्ये सध्या असलेल्या सुविधांचा विस्तार करीत खेळाडूंना लाभदायक होईल अशाप्रकारे सर्व सुविधांचे एकत्रीकरण करणे आणि गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण ‘व्हेन्यू’ म्हणून नावारूपास आणणे हा सदर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्लब हाऊस विकसित करण्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यमुळे या क्लबहाऊससाठी सर्वोत्तम, नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक डिझाईन पुढे याव्यात म्हणून ही स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत, असे पवार म्हणाले.

इच्छुक वास्तुविशारद आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला लागून असलेल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्लब हाऊसचे डिझाईन सादर करण्यासाठी आम्ही औपचारिकरीत्या निमंत्रित करीत आहोत असे सांगत आयआयएच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष विकास अचलकर म्हणाले की क्लब हाऊस येथे खेळाडूंच्या निवासासाठी सुसज्ज अशा खोल्या असाव्यात असे आम्ही एमसीएला सुचवत आहोत. या खोल्यांचे व संबंधित सुविधांचे व्यवस्थापन नामांकित आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळी द्वारे केले जाऊ शकेल. ज्यामुळे सामन्याच्या वेळी खेळाडू आणि त्यांच्या मदतीला असलेल कर्मचारीवर्ग यांची मोठी सोय होईल व सरावासाठी जास्त वेळ देता येईल.

तसेच खेळाडूंसाठी स्टेडीयमजवळ अशी निवासी व्यवस्था निर्माण केली गेल्यास सामन्यांच्या दिवशी शहरातील हॉटेल ते स्टेडियम या प्रवासासाठी लागणारा अमूल्य वेळ वाचवण्याबरोबरच लॉजिस्टिक्स आणि सुरक्षाव्यवस्थेवर असलेला ताण कमी होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत होईल. असे घडल्यास, एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची निवासव्यवस्था स्टेडियमजवळच देणारे देशातील पहिले स्टेडियम ठरेल, असे अचलकर म्हणाले.

व्यावसायिक वास्तुविशारदांसाठी ‘सिंगल स्टेज कॉम्पिटिशन’ आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयडियाज कॉम्पिटिशन’ अशा दोन भागांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल. आयआयएच्या पुणे केंद्रावर स्पर्धेचे नियोजन, व्यवस्थापन व प्रवेशिकांचे मूल्यमापन अशी जबाबदारी असेल. स्पर्धेसंदर्भातील सर्व माहिती एमसीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येत्या १० ते ३० सप्टेंबर दरम्यान स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नोंदणी करता येईल. यानंतर डिझाईन सादर करण्याची प्रक्रिया ५ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर दरम्यान पार पडेल. यामधून निवड झालेल्या डिझाइन्सचे सादरीकरण ५ ते ८ जानेवारी दरम्यान तर अंतिम निकाल १५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल. यानंतर विजेत्या डिझाईनच्या वास्तुविशारदाला पुढील यशस्वी अंमलबजावणीबरोबरच स्थापत्य आणि इतर संलग्न सेवा प्रदान करण्यासाठी ‘प्रोजेक्ट आर्किटेक्ट’ म्हणून म्हणून नियुक्त केले जाईल.

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या क्लब हाऊस प्रकल्पात राहण्यासाठी जागतिक दर्जाच्या खोल्या, समारंभांसाठी बँक्वेट हॉल, स्पोर्ट्स बार, रेस्टॉरंट, अत्याधुनिक व्यायामशाळा, जलतरण तलाव, वर्षभर सरावासाठी इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्या आणि इनडोअर प्रकारातील इतर अनेक खेळ प्रस्तावित आहेत.

सदर स्पर्धेत खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील

व्यावसायिकांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी स्पर्धेचे बक्षीस अनुक्रमे रुपये २५ लाख, रुपये १५ लाख आणि रुपये १० लाख इतके आहे. याशिवाय प्रत्येकी तीन लाख रुपयांची पाच गुणवत्ता पारितोषिकेही या श्रेणीत देण्यात येणार आहेत.

विद्यार्थी गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रुपये तीन लाख, रुपये दोन लाख आणि रुपये एक लाख इतकी परितोषिकांची रक्कम असणार आहे.

याबरोबरच पुरस्कार वितरणाच्या दिवशी एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये मूल्यमापन समितीने निवडलेल्या व्यावसायिक वास्तुविशारदांचे व विद्यार्थ्यांचे डिझाईन प्रदर्शित केले जातील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...