डॉ. विनिता आपटे यांना  ‘ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’ 

Date:

पुणे :
पर्यावरण  संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या  तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.विनिता आपटे यांना  इंडॉ-स्कँडिक ऑर्गनायझेशनचा ‘ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड  ‘ हा पुरस्कार मिळाला  आहे. हा पुरस्कार बाल्टिक वॉटर कॉन्फरन्स (हेलसिंकी)  येथे  नुकताच  इंडो-स्कँडिक ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष  सुरेश पांडे यांच्याहस्ते देण्यात आला. इंडो-स्कँडिक ऑर्गनायझेशन ही संस्था भारतीय संस्कृती व पर्यावरण विषयक विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचा  गौरव व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवत असते . 
पुरस्कार देताना इंडो-स्कँडिकचे अध्यक्ष सुरेश पांडे म्हणाले ,’डॉ विनिता आपटे गेली दोन दशके  पर्यावरण जागृती व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. भारताच्या बाहेरील स्वयंसेवी संस्थांना दिशा देण्याचं काम करणे ,अनेक संस्थांबरोबर उपक्रम राबवणे यासाठी हा पुरस्कार त्यांना देताना अतिशय आनंद वाटतो ‘.  
पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत असलेल्या जिव्हाळ्यातून डॉ. विनिता आपटे यांनी तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च, रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हॉयर्नमेंट) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. पॅरिसमध्ये युनायटेड नेशन्स एनव्हॉयर्नमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही ते काम पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन पर्यावरण क्षेत्रात त्यांनी आपले काम सुरू ठेवले. गेल्या ७ वर्षांमध्ये पाच लाखापेक्षा जास्त झाडे महाराष्ट्र , कर्नाटक , गुजराथ, राजस्थान, हरयाणा ,तामिळनाडू इत्यादी ठिकाणी लावून त्यांचे जतन करण्याचे काम करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे.२१ ठिकाणी जंगले  तयार केली आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर लखनौ, मोरादाबाद, सानंद, कर्नाटक ,चेन्नई या शहरांचा समावेश आहे .मुंबई , चेन्नई ,आंध्र प्रदेश इथल्या किनाऱ्यांवर २ लाखापेक्षा जास्त मॅन्ग्रूव्ह  प्लांटेशन करून तिथल्या महिलांना रोजगार मिळवून दिला.
डॉ.आपटे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन पर्यावरणीय प्रश्नमंजुषा स्पर्धां आयोजनात  पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेने २.३ कोटी  विद्यार्थ्यांपर्यंत जागृती केली आहे.  तेर  ऑलिंपियाडमध्ये १२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि डॉ. अब्दुल कलाम फेलोशिपने गेल्या पाच वर्षांत ६००० हून अधिक अर्ज प्राप्त केले आहेत, ज्यामध्ये जवळपास ५० अर्जदारांना फेलोशिप मिळाली  आहे.  ‘तेर एनव्हायरोथॉन ‘ ही  जनजागृती दौड गेली ३ वर्षे आयोजित केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...