मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत-अरविंद शिंदे

Date:

पुणे-

     मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने आज कोहिनूर चौक, कॅम्प येथे सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,आबा बागुल,बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी,आमदार रविंद्र धंगेकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते .

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘सिंधुदुर्गसारख्या महत्वाच्या किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा तर तज्ञांची मदत घ्यायला हवी होती, परंतु मिंध्यांनी टक्केवारीसाठी शिवरायांनाही सोडले नाही. ठाण्यातील कंत्राटदाराला पुतळ्याचे काम दिले होते. पुतळ्याच्या निर्माणकार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्‍हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचे घेणे देणे नाही. कमिशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढेच काम निष्ठेने सुरू आहे. तीन शतकानंतरही सिंधुदुर्ग छातीचा कोट करून समुद्रात उभा आहे. पण मिंधे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट येथे उभारलेला शिवरायांचा पुतळा वाऱ्याच्या झोताने कोसळला. लोकसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याच्या हेतूमुळे स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिले गेले नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रत्येक प्रतिमा जपायला पाहिजे.’’

     यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुटे आदींनीही भाषणे केली.

      यावेळी संगीता तिवारी, दत्ता बहिरट, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, अजित दरेकर, मुख्तार शेख, अविनाश साळवे, सतिश पवार, मुन्नाभाई शेख, भीमराव पाटोळे, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, असिफ शेख, राजेंद्र शिरसाट, वाहिद निलगर, अमित घुले, चेतन आगरवाल, सुरेश कांबळे, नुर शेख, लतेंद्र भिंगारे, संगीता पवार, सुरेखा खंडागळे, शोभना पण्णीकर, सुनिता नेमुर, बेबी राऊत, माया डुरे, रजिया बल्लारी, सीमा सावंत, सुंदर ओव्‍हाळ, छाया जाधव, संगीता क्षिरसागर, सोनिया ओव्‍हाळ, मीरा शिंदे, हर्षद हांडे, मिलिंद अहिर, विठ्ठल गायकवाड आदींसह महाविकास आघाडीतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रात्रीच्या वेळी एक तरुणी पोलीस ठाण्यात आली…अन महिला पोलिसानेच तिला बुधवारात पोहोचवले ..

पोलीस आणि कुंटणखाणा मालकिणीचे संगनमत - महिला पोलीस निलंबित...

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड

हर्बालाइफ व फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

महापालिकेच्या ४ शाळांना CSR द्वारे मिळणार स्टेम लॅब

पुणे- महापालिकेच्या ४ शाळांना CSR उपक्रमांतर्गत स्टेम लॅब देण्यात...