पुणे- येथील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केल्याची माहिती येथे सह आयुक्त रंजनकुमार यांनी दिली यात एकूण १५ आरोपी असावेत असे आता समजते असे ते म्हणाले. हि हत्या संपत्तीच्या वादातून झाली किंवा कसे हे तपासले जात असून अटक आरोपींच्या त वनराज याच्या दोन बहिणी आणि २ मेव्हणे यांचा समावेश आहे. जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
काल रात्री चार ते पाच बाईकवरुन आलेल्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हल्ला केला. आंदेकर यांच्यावर आरोपींनी पाच गोळ्या चालवल्या आणि त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला.
कौटुंबिक आणि वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. वनराज यांची पाच गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. वनराज यांच्या हत्येमागे त्यांच्या कुटुंबियांचाच हात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
“रविवारी रात्री समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नामदार चौक येथे वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ उभे होते. त्यावेळी बाईकरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर वनराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच वनराज यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
शरद मोहोळ याच्या खूनानंतर पुणे शहरातील हा दुसरा खळबळ उडवून देणारा खून आहे. वनराज आंदेकर हे निवांत गप्पा मारत उभा असताना आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीनं त्यांच्यावर सिनेस्टाईल हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे टोळीतील किमान पाच जणांच्या हातात बंदुक होती. तर बाकीच्यांनी शर्टमध्ये लपवून कोयते आणले होते. या पाचही आरोपींनी अचानक फायरिंग सुरू केली. तर एकाने वनराज यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. वनराज कंपाउंडच्या आतमध्ये गेल्यावर जिंवत राहू नये म्हणून त्यांच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले. यातीलचार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना फरासखाना पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकानं अटक केली आहे.घटनेवेळी वनराज याची सख्खी बहीण तिच्या घराच्या गॅलरीमधून ‘याला मारा, मारा’ म्हणत होती अशी तक्रार वनराज यांच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली आहे. त्यानुसार, आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांचे पती अशा 4 जणांना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या सराईत गुंड सोमनाथ गायकवाड यासही टेंभुर्णी येथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या 2 सख्ख्या बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. जयंत लक्ष्मण कोमकर (वय-५२ वर्षे, रा. भवानी पेठ , पुणे ), गणेश लक्ष्मण कोमकर (वय-३७ रा.३०९ वर्षे, रा. भवानी पेठ ,पालखी विठोबा चौक, पुणे), संजीवनी कोमकर, कल्याणी कोमकर, अशी आरोपींची नावे आहे. याबाबत आरोपींवर समर्थ पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१),६१ (२) सह आर्म अॅक्ट कलम ३ (२५),४ (२५) २७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ क्रिमीनल लॉ अर्मेन्मेंट अॅक्ट ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त परीमंडळ एक संदिपसिंग गिल्ल यांनी सांगितल्याने पोलिस उपनिरीक्षक एस बरुरे, हवालदार शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, मयुर भोसले, गणेश काठे, शिपाई आशिष खरात, राहुल मोरे, एन बाबर आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी हवालदार सचिन अहिवळे यांना आरोपी गणेश लक्ष्मण कोमकर व जयंत लक्ष्मण कोमकर यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार सदर दोघांना अटक करण्यात आली आहे.
गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्यांनी त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने हे दुकान अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. त्यानंतर आंदेकर कुटुंबात वादाला सुरूवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करत होता. त्याने स्वत:ची गँगही तयार केली होती. एका वादात मध्यस्थी करून भांडण मिटवल्याच्या, तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना ‘तुला पोरं बोलवून ठोकतेच’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यात ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे.