पुणे-पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते मा.श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालक बंधूंना मोफत गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, १ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता मुकुंद नगर, पुणे येथील कटारिया हायस्कूल मैदानावर होणार आहे.
ज्या रिक्षा चालकांनी नोंदणी करत रिक्षावर स्टीकर लावले आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल.ह्या कार्यक्रमाचा उद्देश रिक्षाचालक बांधवांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना मदतीचा हात देणे हा आहे. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, तुमच्यासोबत संवाद साधणार आहेत.
या उपक्रमात पर्वती विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी सहभागी व्हावे व
अधिक माहितीसाठी ९९२१९०९२५० या क्रमांकावर संपर्क साधावा ,असे आवाहन पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे.