पुणे- एका सेवानिवृत्त दाम्पत्यांना हेरून चोरट्यांनी सुमारे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हातोहात पळवून नेल्याची घटना मांजरी बुद्रुक येथे घडली . याप्रकरणी पोलिसात तक्रार दिलेल्या फिर्यादीने आपल्या जबाब्त म्हटले आहे कि,’मी दशरथ बाबुलाल धामने, वय-69 वर्षे, धंदा-सेवानिवृत्त, रा.ठी. ऐ/201, व्हाईट फिल्ड सोसा. नंदीनी टकले नगर, पुणे सोलापूर रोड, मांजरी (बु), पुणे समक्ष हजर राहून जबाब देतो की, मी वरिल प्रमाणे असुन वर नमुद ठिकाणी माझी पत्नी जयश्री वय-61 वर्षे, मुलगा स्वप्निल वय 36 वर्षे, सुन सारीका वय-36 वर्षे व दोन नातवंडे यांच्यासह राहण्यास आहे. मी व्हॅक्युम कंपनी मधुन तर माझी पत्नी मुकबधीर शाळेतुन शिक्षीका म्हणून सेवानिवृत्त झाली असून आम्हाला मिळणा-यासेवानिवृत्त वेतनावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आम्ही आमच्या राहत्या सोसायटीतच डिसेंबर 2023 मध्ये बी/301, व्हाईट फिल्ड सोसा. नंदीनी टकले नगर, पुणे-सोलापूर रोड, मांजरी (बु), पुणे येथे नवीन प्लॅट खरेदी केला आहे त्यासाठी आम्ही जाने 2024 मध्ये आमच्या जवळील 19 तोळे सोन्याचे दागिने उरुळी कांचन येथील स्टेट बैंक ऑफ इंडिया मध्ये तारण म्हणून ठेवले व त्यावर 08 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. माझी पत्नी जयश्री धामने यांना मागील आठवडयात त्यांना सेवानिवृत्ती नंतरचा जी.पी. एफ. फंड रक्कम परत मिळाल्याने आम्ही आमचे तारण सोने सोडवुन घेण्यासाठी आज दिनांक 29/08/2024 रोजी दुपारी 12.00 वाजताच्या सुमारास राहते घरातुन निघून दुपारी 01:00 वाजताच्या सुमारास उरुळी कांचन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे पोहचलो तेथे गेल्यावर आम्ही माझ्या पत्नीच्या पेन्शन खात्यावरील 08 लाख रुपये रक्कम वळती करुन आमचे बँकेतील दागिने सोडवून घेतले त्यानंतर सर्व दागिने एका कापडी पिशवीत ठेवले. आम्ही बँकेतील सर्व व्यवहार पुर्ण करुन दुपारी 02.30 वाजताचे सुमारास माझ्या ताब्यातील एक्टीवा वरुन आमच्या राहत्या घरी जाण्यासाठी निघालो आम्ही दुपारी 03.45 वाजताच्या सुमारास रोहित वडेवाले, शेवाळवाडी पी.एम.पी.एल. बस डेपोच्या जवळ, पुणे-सोलापुर, शेवाळवाडी, पुणे येथे आलो असता माझे पत्नीने मला नातवांडासाठी वडापाव घेवुन येण्यास सांगितले त्यामुळे मी तेथेच रस्त्याच्या कडेला गाडी बाजुला लावून वडापाव घेण्यासाठी दुकानात गेलो सदर वेळी माझी पत्नी गाडीपाशी थांबली होती तर आम्ही बँकेतुन सोडवुन आणलेले दागिने , मोबाईल फोन व बँकेची कागदपत्रे कापडी पिशवी एक्टीव्हा गाडीच्या सिट समोरील हँडेलच्या हुकाला अडकवुन ठेवले होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या एका मोटर सायकल चालक माझ्या पत्नीला तुमचे पैसे समोरच रस्त्यावर पडले आहेत असे म्हणुन लक्ष विचलीत केले त्यावर माझ्या पत्नीने थोडे पुढे जावुन खाली पड़लेले पैसे उचलेले व पुन्हा गाडीपाशी आली असता एक इसम गाडीच्या हुकाला अडकविलेली दागिण्याची पिशवी घेवून पळत असल्याचे दिसला म्हणून माझ्या पत्नीने आरडा ओरडा करत त्याचा पाठलाग केला परंतु तो त्याचे इतर साथीदाराचे गाडीवर बसून निघून गेला.
चोरीस गेलेल्या दागिन्यांची यादी …
1) 60 ग्रॅम वजनाच्या हातातील 04 नग सोने या धातुच्या पाटल्या.
2) 40 ग्रॅम वजनाच्या हातातील 02 नग सोने या धातुच्या बांगड्या.
3) 20 ग्रॅम वजनाच्या हातातील 05 नग सोने या धातुच्या वेडयाच्या
अंगठ्या.
4) 50 ग्रॅम वजनाच्या गळ्यातील 01 नग सोने या धातुचे गंठण खाली पेंडल
5) 25 ग्रॅम वजनाच्या गळयातील 01 सोने या धातुचे गंठण खाली डोरले वाटया असलेले.
6) स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँक पासबुक, दोन चेकबुक, डेबीट कार्ड, जिजामाता बैंक चे पासबुक, आर डी बुक,
7) अंदाजे 08,000 /- रु. कि.चा रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन
हडपसर पोलीस उपनिरीक्षक विनोद पवारयांनी तक्रार दाखल करवून घेतली असून याप्रकरणी अंमलदार पोलीस नाईक 7566 पांडुळे चोरट्यांचा शोध घेत आहेत.