शिवसेना पुणे शहराच्या वतीने राणे पिलावळीविरोधात आंदोलन
पुणे:- मालवण येथील राजकोट किल्ल्यावर चा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पर्णकृती पुतळा नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाला होता , हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आणि महाराष्ट्रात शिवप्रमेंमध्ये असंतोष निर्माण झाला ,या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा दुर्घटना ग्रस्त पुतळा पाहण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे काल मालवण येथे गेले असताना नारायण राणे आणि त्याच्या पिलावळांनी तिथे उन्माद माजवला, स्थानिक शिवसैनिकांना धमक्या दिल्या , पोलिसांशी अरेरावी केली, या विरोधात आज पुणे शहरात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली राणेला जोडे मारा आंदोलन घेण्यात आले .यावेळी चाराने , बाराणे अटक करा राणे” घोषणांनी बालगंधर्व परिसर द्दुमदुमला, शिवसैनिकांनी राणे पिल्लावळीना चपलांचा हार घातला .
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी सिंधुदुर्ग ही राणेंची बाप संपत्ती नसून अखंड महाराष्ट्राची संपत्ती आहे हा अडविणारा कोण ? फडणवीस हेच अश्या गुंडप्रवृत्ती महाराष्ट्रात वाढविण्यास खतपानी देतात का ? असा प्रश्न केला , नारायण राणेला तात्काळ अटक न झाल्यास महाराष्ट्रासमोर खोट्या गृहमंत्र्यांचा चेहरा लवकरच समोर येईलच असे बोलले.
शहरप्रमुख संजय मोरे यांनी या प्रकरणात सरकार ने संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल न केल्यास , गुंडगिरी करणाऱ्या राणे ला अटक न केल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे सांगितले .
यावेळी आंदोलनात शिवसेना उपनेत्या सुषमाई अंधारे , शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे , उपशहर प्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहर संघटक किशोर रजपूत , विलास सोनवणे, संतोष गोपाळ,महिला जिल्हा समन्वयक कल्पनाताई थोरवे, शहर सांघटिका पल्लवी ताई जावळे , माजी नगरसेवक विशाल धनवडे, संजय भोसले, वसंत मोरे, सचिन भगत, सागर माळकर, युवासेना शहर संघटक सनी गवते, युवराज परीख, चेतन चव्हाण , निलेश जठार , राजेश मोरे, प्रसाद काकडे, चंदन साळुंखे, नागेश खडके, नंदू येवले, तेजस मर्चंट, अजित जाधव, दिलीप पोमान, मारुती नानवारे, महिला आघाडीच्याअमृत पठारे, रोहिणी कोल्हाल, ,सुनीता खंडाळकर ,ज्योती चांदोरे , सोनाली जुनवणे ,शितल जाधव , करुणा घाडगे, निकिता मारटकर , प्रवीण भोर ,वैशाली बनशेत, नितीन दलभंजन, संतोष भूतकर, मुकुंद चव्हाण, अजय भुवड, निखिल खांदवे, अजय वाल्हेकर, श्रीकांत खांदवे, जाणू आखाडे, राहुल शेडगे ,हेमंत यादव, हरिश्चंद्र सपकाळ, सूर्यकांत पवार,अमोल निकुडे, गणेश खलाटे, संजय गवळी, गोविंद निंबाळकर, नाना मरळ, नितीन रावळेकर, विलास नावाडकर, ऋषिकेश चव्हाण, इतर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते .