पुणे ः पुणे महानगर परिवहन महामंडळातील कर्मचा-यांची गेल्या अनेक वर्षांपासुन सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम तसेच त्यांच्या इतरही काही महत्वाच्या मागण्यांबाबत आज सर्किट हाउस येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी परिवहन महामंडळाच्या सी. एम. डी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, यांच्या प्रमुख उपस्थित बैठक बोलविली ,सदर प्रसंगी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख,हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष डॉशंतनुजगदाळे,कामगार प्रतिनिधी नुरुद्दीन इनामदार, राजेंद्र कोंडे, हरीश ओहळ, राहुल कुटे, उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये कामगारांचा प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचा फरक (चार-४) समान हप्त्यात देण्याचे धोरण ठरले आहे. पहिला हप्ता चालू महिन्यातच तातडीने देण्याचे आदेश अजितदादा पवार यांनी आज दोन्ही आयुक्तांना दिले ,त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून बदली, रोजंदारी, हंगामी सेवक म्हणून काम करणारे कामगार कायम होण्याची मागणी करत होते. त्यावर तोडगा काढत या विषयात उच्च न्यायालयच्या आदेशाप्रमाणे ज्या सेवकांची २४० दिवस हजेरी भरलेली आहे, अशा १७४८ बदली सेवाकांना तातडीने कायम करण्याचे आदेश त्यांनी या प्रसंगी दिले
सणासुदीच्या या दिवसात अजितदादांच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांच्या धरात सुखाचा व आनंदाचा गोडवा निर्माण होणार आहे , सदर निर्णयाचे सर्व डेपोतील कामगारांनी अत्यंत उल्हासातव जोशात स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला

