पुणे-ज्ञानेश्वरांची अभंगगाथा म्हणजे नामभक्तीचा अलौकिक चैतन्यदीप! ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रचार आणि प्रसारासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, कोथरूड मतदारसंघात घरोघरी ज्ञानेश्वरी असावी या हेतूने ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त कोथरुडमध्ये घरोघरी ज्ञानेश्वरी उपक्रम हाती घेतला आहे. कोथरूड मधील प्रत्येक घरात जाऊन ज्ञानेश्वरी वाटप करण्यात येत आहे.
यावेळी मंदिर ट्रस्टचे संजय काळे, विकास जाधव, दिपक कुल, भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, दुष्यंत मोहोळ, दीपक पवार, कांचन कुंबरे, विठ्ठल बराटे, सचिन मोकाटे, अंबादास आष्टेकर, अमित तोरडमल, प्रदीप जोरी, जयंत दशपुत्रे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महाभारत काळात कौरव-पांडव युद्धाप्रसंगी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता. त्या संस्कृत भाषेतील ग्रंथाचे प्राकृत मराठी भाषेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी बाराव्या शतकात केलेले विवेचन म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी! त्यातील प्रत्येक ओवी व प्रत्येक शब्द दरवेळी आपल्याला नवी अनुभूती देतो, असा भाविकांचा अनुभव आहे.
त्यामुळे प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी असावी, या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपक्रम हाती घेतला असून; आजपासून घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम हाती घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ आज कोथरुड मधील वनाझ सोसायटी भागात झाला. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः वनाझ सोसायटीतील नागरिकांच्या घरी जाऊन ज्ञानेश्वरी वाटप केले. यावेळी ज्ञानेश्वरी आपल्या घरी आल्याने अनेकजण भावूक झाले. मोठ्या श्रद्धेने ज्ञानेश्वरीची प्रत देवघरात ठेवून त्याचे पूजन केले.