Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुलीबाळींवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याला राजकारण म्हणून घटना साधारण करण्याचा प्रयत्न निंदनीय

Date:

भर पावसात आंबेडकर पुतळ्याजवळ मविआ चे बदलापूर आणि त्यासारख्या घटनांच्या विरोधात आंदोलन

पुणे- बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने राज्यभर निषेध आंदोलन केले जात आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तिथे शरद पवार यांनी बदलापूरच्या घटनेवरून सरकारला खडेबोल सुनावत आपल्या कार्यकर्त्यांना महिलांचा आदर राखत त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची शपथ दिली.पुण्यातील स्टेशन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भर पावसात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , आबा बागुल ,आमदार रविंद्र धंगेकर राष्ट्रवादीचे अध्यक्ष ,माजी महापौर प्रशांत जगताप कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे ,शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे , माजी आमदार मोहन जोशी ,दीप्ती चवधरी , जयदेव गायकवाड ,अभय छाजेड, संगीता तिवारी,विशाल धनवडे, बाळासाहेब शिवरकर, वंदना चव्हाण महाविकास आघाडीचे इतर नेते व कार्यकर्ते या मूक आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तोंडाला काळी मुखपट्टी बांधून हे मूक आंदोलन करण्यात आले.

शरद पवार म्हणाले की, आज आपण एका अस्वस्थ करणाऱ्या घटनेसाठी एकत्र जमलो आहोत. बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकास प्रचंड धक्का बसला. आजच्या राज्यकर्त्यांना कोणत्याही संवेदनशील घटनेची जाण नाही. यामुळे बदलापूरचा प्रकार घडला. महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी घडल्यात. दररोज महिला व भगिनी अत्याचाराला बळी पडत आहेत.हे राज्य शिवछत्रपतींचे राज्य आहे. शिवछत्रपतींच्या राजवटीत अशाच एका भगिनीवर अत्याचार केला होता. त्याची तक्रार शिवाजी महाराज यांच्यापर्यंत गेली होती. तेव्हा महाराजांनी आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जे काही घडत आहे, त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. त्यांनी संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे.शरद पवार म्हणाले, मला एका गोष्टीचे दुःख होत आहे. राज्यकर्ते व त्यांचे सहकारी बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत. हे लोक मुलीबाळींवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याला राजकारण म्हणत असतील, राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे स्पष्ट होते. महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारीत आहे याची प्रचितीही त्यातून येते. महाराष्ट्रात जे काही घडले ते घडू नये अशी आमची अपेक्षा आहे आणि ज्यांनी घडवले त्यांचा तीव्र निषेध सर्वांनी केला पाहिजे.

यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शपथ दिली. ती शपथ खाली वाचा जशासतशी…

शरद पवार म्हणाले, मी अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधिही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा उंबरा, माझे गाव, माझे ऑफिस, कोणत्याही ठिकाणी महिलांची छेडछाड अथवा छेडछाड अथवा अत्याचार होत असेल, तर त्यास मी विरोध करून त्याविरोधात आवाज उठवीन. मी मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव कधिही करणार नाही. महिलांचा सन्मान राखीन आणि महाराष्ट्रासह देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित व भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन. जयहिंद.

उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद अवैध घोषित करत बंदची हाक देणाऱ्या राजकीय पक्षांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. कोर्टाच्या या भूमिकेनंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बंग मागे घेण्याची घोषणा केली होती.बदलापूरमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यभरात मूक आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, मोठ्या आंदोलनाची ही तर फक्त सुरुवात आहे. ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे. आपल्याला सुरक्षेसाठी मोठे काम करायचे आहे. गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहेत. कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या पीडित मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर येऊ नये. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला सुरुवात करूया. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही.”सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “बदलापूर आंदोलनात सहभागी झालेले लोक बाहेरचे होते, असे सरकार म्हणत आहे. परंतु लोक कोणीही असो ते भारतीय होते आणि बदलापूरच्या लेकीसाठी एकत्र आले. हे सरकार असंवेदनशील आहे. इतके गलीच्छ सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही.”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाशी दिल्याच्या विधानावर देखील सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, “गुंडांना आता पोलिसांची भीती राहिली नाही. मुख्यमंत्री म्हणत होते पुणे जिल्ह्यातील एका अत्याचारच्या घटनेतील आरोपीला फाशी दिली आहे. असा प्रकार घडला असेल तर आपण मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करायला पाहिजे. सरकार असंवेदनशील आहे. सरकारचा आणि त्या कृतीचा आपण निषेध करतो.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...