प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खुलेआम पडत आहेत बळी: ब्लॅकमेलर्स लोकांचा सुळसुळाट
सरकारी बाबूशाहीने मांडला बाजार….सीसी टीव्ही फुटेज गायब होऊ लागले…एका प्रमुख अधिकाऱ्याच्या दालनातील 4 जुलै,8 जुलै, 9 जुलै आणि 10 जुलै या दिवसांचे सकाळी साडेदहा ते साडेअकरा आणि संध्याकाळी 5 ते साडेसहा या वेळेतील सीसी टीव्ही फुटेज १५ जुलैलाच केले गायब
पुणे – महापालिकेतील शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेविषयी एजंटगिरी करणाऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर या तक्रारींची चौकशी ज्या सहाय्यक आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आली. आता त्याच अधिकाऱ्याकडेच शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेची खाती देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.यामुळे महापालिकेतील अंदाधुंद कारभाराची झलक आता स्पष्ट होऊ लागली आहे. याच अधिकाऱ्या समोरच घडलेल्या आरोग्यप्रमुखांच्या कार्यालयातील 4 जुलाई, 8 जुलाई, 9 जुलाई आणि 10 जुलै या दिवसांचे सकाळी साडेदहा ते साडेअकरा आणि संध्याकाळी 5 ते साडेसहा या वेळेतील सीसी टीव्ही फुटेज १५ जुलैलाच माय मराठी ला वृत्त येताच गायब करून टाकल्याची माहिती हाथी आली आहे.दरम्यान याच अधिकाऱ्याकडे गेली सुमारे ९ वर्षापासून औषध भांडार खाते अव्याहतपणे ठेवण्यात आले असून महापालिका रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकीकरण,आरोग्य प्रकल्प, परिमंडळ १ सनियंत्रण व पर्यवेक्षण अधिकारी पदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे यामुळे विभागातील या अधिकाऱ्याच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेचे आता कौतुक होऊ लागले आहे.आणि सरकारी बाबूंच्या खाबुगीरीच्या चर्चेला हि उधाण येऊ पाहते आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील ‘त्या’ बहुचर्चित प्रकरणाची वैशिष्ट्ये:
१)महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या दालनात अधिकारी महिलेकडून महिलेलाच अश्लील शिवीगाळ,३ साक्षीदार यापैकी १) सीसी टीव्ही २)ज्युनिअर असलेला सहायक आरोग्य अधिकारी आणि आणखी एक महिला अधिकारी
२) यापैकी सीसी टीव्ही चा विषय १५ जुलैला माय मराठी कडून बाहेर येताच सीसी टीव्ही फुटेज गायब..आणि साक्षीदार असलेल्याच दिले आपल्या सिनिअर अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या बिन पुराव्याच्या तक्रारीवर चौकशीचे काम
३)आयुक्तांनी सोपविले अतिरिक्त आयुक्तांकडे चौकशीचे काम आणि अतिरिक्त आयुक्तांनी सोपविले ज्युनिअर असलेल्या सहायक आरोग्य अधिकाऱ्याकडे चौकशी.. अहवालात दोष कुणावर हे जाहीर नाही मात्र चौकशी करणाऱ्यांनाच देऊन टाकली चौकशी होणारी खाती
४) शासकीय सहाय्य योजनेचा फायदा मिळवून देतो सांगून ज्यांच्यावर रुग्णाकडून पैसे घेतल्याचे आरोप,पोलिसात तक्रारी त्यांनीच योजना संगणकीय…ऑनलाईन झाल्यावर आक्षेप घेत,आंदोलने केली. त्यांना महापालिकेतील २ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रामाणिक अधिकाऱ्याचा दिला बळी..
5) स्वतःला रुग्णांचे हक्क मिळवून देणारे स्वयंसेवक म्हणविणारे प्रामाणिक अधिकाऱ्यांना करतात बदनाम आणि रुग्ण आणि त्याच्यामार्फत चालवितात वसुलीचे रॅकेट,बडे बडे रुग्णालये गळाला पण शेवटी रुग्णच जातोय तळाला