पुणे दि २० ॲागस्ट
“राजीव गांधी हे लोकहितांच्या प्रश्नाला संवेदनशीलपणे प्रतिसाद देणारे नेते होते हे मी स्वतः अनुभवले आहे. उत्पादन शुल्क कराबाबत सामान्य नागरिकांची व देशाची जी लूट होत होती त्या संदर्भात माझे समोर सुनावणी सुरू होती व त्यावर मी कंपन्यां विरोधी निकाल देखील दिला होता.. त्या वरून भेटण्यासाठी त्यांनी मला रात्री दोन ला चर्चेला बोलावले होते आणि त्या विषयी कर परती (रिफंड) बाबत चा ‘माझा निकाल मार्ग दर्शक ठरवून’ कायदा्यात दुरुस्ती करून, प्रसंगी चुक मान्य करून विषय मार्गी लावला होता, हा अहंकार विरहीत, मनाचा मोठेपणा देशहित व लोकहित जोपासणारा होता”, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केले आहे.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त कात्रज येथील स्मारक – पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्याचा कार्यक्रम कोळसे पाटील यांच्या शुभ हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अघ्यक्ष, काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी स्वागत प्रास्ताविक केले.
राजीवजी गांधी यांनी काळा सोबत पावले उचलत, देशात वेळीच संगणकीकरण केल्याने, कोरोना काळात लोक संपर्का पासुन बचावासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून कामे करता आली. तसेच, ‘आधुनिक भारताची पाया भरणी करतांना भारतीय संस्कृती, प्राचिन स्थळे व कला – संस्कृतीचे जतन करण्या करीता १९८४ साली हेरीटेज कायदा केल्याचे सांगातले. “इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज” (INTACH) ची स्थापना नवी दिल्लीत त्यांचेच अध्यक्षते खाली भारतात ‘वारसा जागरुकता आणि संवर्धन कायदा’ समिती गठीत करून करण्यात आल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.
सौ कमलताई व्यवहारे यांनी मोबाईल, इंटरनेट क्रांती बरोबरच, स्थानिक स्वराज्य संस्थेत महीला आरक्षण दिल्या बद्दल स्व राजीवजी गांधी यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी ऊद्यान अधिक्षक डॅा राजकुमार जाधव, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीवजी जगताप, सुर्यकांत मारणे, सुभाषशेठ थोरवे, रामचंद्र शेडगे, राजेंद्र खराडे, द स पोळेकर, सौ मनिषा फाटे, अविनाश गोडबोले, रमेश सोनकांबळे, नंदुशेठ पापळ, भोला वांजळे, संग्राम मोहोळ, पृथ्वीराज पाटील, महेश ढमढेरे, धनंजय भिलारे, ॲड स्वप्नील जगताप, पै शंकर शिर्के, गणेश शिंदे, ॲड सचिन अडसुळ, ॲड संदिप ताम्हणकर, ॲड फैयाझ शेख, योगीराज नाईक, प्रशांत जाधव, संजय अभंग, गणेश मोरे, गोरख पळसकर, विकास दवे, डॅा भरत कदम, विकास शिरोळे, हरीभाऊ महाले, विजय हिंगे, नरसिंह अंदोली, गणेश गुगळे, आशीश वाधमारे, राजेश सुतार, नरेश आवटे इ कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
स्मारक समितीचे जेष्ठ सदस्य सुभाषशेठ थोरवे यांनी आभार प्रदर्शन केले व सामुहीक राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.