पुणे- पुण्याच्या राजकारणात पुण्याच्या नेत्याचे वर्चस्व राहिलेले नाही हे आता किमान गिरीश बापट यांच्या निधनानंतर तरी स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या राजकारणातले सारे निर्णय आता देवाभाऊ घेत असल्याचे भाजपच्या वर्तुळातून दिसून येते आहे.आपले पुणेकर अण्णा खासदार झाले आणि मंत्रीही झाले याचा आनंद जरूर पुणेकर भाजपवासियांना आहे,पण तरीही त्यांना हेमामालिनी बद्दल प्रश्न पडतो हेमामालिनी ३ वेळा खासदार झाल्या पण त्यांना अजूनही मंत्रीपद दिले गेलेले नाही. बापट,शिरोळे हे पुण्यातून खासदार होतेच.पण हरकत नाही अण्णांना मंत्रीपद मिळाल्याने पुण्याला आनंदच झाला आहे.आता हेमामालीनीचा विषय मागे पडलेला आहे.आता विषय आहे तो पुण्यातील एका महिला आमदाराचा,होय पर्वती मतदार संघातील आमदार माधुरी मिसाळ यांचा..त्याही ३ वेळा आमदार म्हणून निवडून आल्यात आता पुन्हा होणाऱ्या विधानसभेला जर त्या निवडून आल्या तर त्यांना मंत्रिपद द्यावेच लागेल अशी स्थिती भाजपात असताना या मतदार संघातून आमदारकीसाठी भाजपचे महापालिकेत सभागृहनेते राहिलेले श्रीनाथ भिमाले यांनी मोठा गदारोळ प्रचारी कारभार सुरु केला आहे.एकीकडे पर्वती मतदार संघातून असा राजकीय बाजार मांडला जात असताना कोथरूड मध्येही मांडला जावा याचे अनेकांना नवल वाटते आहे. कोथरूडला तर गेल्यावेळी कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांना आणून आमदार केले गेले,दादांनी कोथरूड मधून आपला जम हि बसविला,पुण्याचे ते पालकमंत्री होते. पण आता कोल्हापूरचे दादा कोथरूड चे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री अशी स्थिती आहे.भाजपच्या राजकारणाची हि स्थिती काही भाजपा वासियांना समजेनासी झाली आहे. नेमके कोण पुण्यातले राजकारण हाताळते आहे ? आता चंद्रकांतदादा यांच्याकडे पुण्याचे नेतृत्व होते तर कोथरूड लाच मेधा कुलकर्णी खासदार आणि अण्णा हि केंद्रीय मंत्री..यात दादांची झालीय गोची..असे भाजपा मधले वातावरण सांगितले जाते..अर्थात खरे खोटे देव जाणे…
कारण पर्वती मतदार संघातून भिमालेंना उमेदवारीसाठी मोहीम उघडण्यास देवाभाऊंनीच सागितले म्हणतात खरे तसेच कोथरूड मधले ही असावे..अशीही कार्यकर्त्यांना शंका वाटते आहे.पण भाजपा शिस्तप्रिय पक्ष त्यामुळे असे बोलायची चोरी..कारण खरे खोटे कोणास ठाऊक ? तर ते..
निवडणूक आली कि जी उगवतात अशा माध्यमांकडून आता पार्वती मधून भिमाले यांनी BOOST प्रचार उमेदवारीसाठी जोरात केलाय पण त्यामुळे या मागचे आमदार काही कामाचे नव्हतेच असे अप्रत्यक्ष दर्शवून आता परिवर्तन हवे असा सूर आवळला जाऊ लागल्याने पक्षाची प्रतिमा हि मलीन होते आहे असा मिसाळ यांच्या गटातील सूर आहे.पर्वतीत उमेदवारी साठी एकूणच चुरस निर्माण झाली आहे, पण मिसाळ हि आता इरेला पेटतील असे दिसले तर नवल वाटणार नाही. उमेदवारी जर त्यांना नाकारली तर त्यांची भूमिका किंवा रसद आबा बागुलांच्या मदतीला येऊ शकेल असा दावा समीक्षक करतील.कोथरूड मधून चंद्रकांत दादांनी जम बसविला असताना त्यांना प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडे दादांच्या तोडीचा उमेदवारच नाही असे सांगितले जाते ना मोकाटे दादांशी फाईट करू शकतील, ना अण्णा हजारेंनी उध्वस्त करून टाकलेले सुतार घराणे दादांशी फाईट करू शकतील असे असताना इथे उमेदवारी बदलायची आवशक्यता नाही असे स्थानिकांचे म्हणणे असताना पक्षाचे काही सांगता येत नाही. असेलही भिमालेंच्या प्रमाणे बालवडकरांच्या डोक्यावर देवा भाऊंचा हाथ असे बोलले जाते आहे. कोथरूड आणि पर्वती हे दोन्ही मतदार संघ भाजपच्या हाताशी असताना ते घालविण्याचा प्रयत्न होऊ नये असेच भाजपा वासियांना वाटणे साहजिक आहे. पण कसबा विधानसभा मतदार संघ देखील आता पुन्हा आपल्याकडे खेचायचा असेल तर आता तरी गेल्यावेळी केली उमेदवार देण्याची चूक तशी करू नका असेही सांगण्यात येते आहे.आता तरी कसबा बापटांच्या सुनबाई ना लढवू द्यात…आमदारकी साठी तिथून त्यंना उमेदवारी नाही दिली तर बहुधा त्यांना महापालिकाच लढवायला लावतील कि काय ? अशी हि शंका उपस्थित होते आहे. एकूणच काय पुण्याच्या भाजपचे राजकारण, चंद्रकांत दादांकडून निसटले कि काय अशी शंका व्यक्त होत असताना केंद्रीय मंत्री झालेल्या अण्णांच्या हाथीही राहिलेले नाही. देवाभाऊ सर्वेसार्वो आहेत.आणि देवाभाऊंचा जर हाथ खरोखर भिमाले आणि बालवडकर यांच्या डोक्यावर असेल तर मात्र मिसाळ ताई आणि बापटांच्या सुनबाई या दोन्ही महिला किमान विधानसभेच्या राजकारणात दिसणार नाहीत असा काही समीक्षकांचा दावा आहे.
लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेल्या महिलांना साड्या वाटपाचा भिमालेंचा भव्य कार्यक्रम
एकीकडे महिलांचे काही भव्य आणि दिव्य कार्यक्रम कोथरूड मधून अमोल बालवडकर करत असताना दुसरीकडे श्रीनाथ भिमालेंनी आता २५ तारखेला गणेश कला क्रीडा मंचावर महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हाथी घेतल्याचे वृत्त आहे .ज्यांना ज्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेचे ३/ ३हजार रुपये मिळालेत अशा सर्व महिलांना sms पाठवून त्यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे साड्या घेऊन सन्मान स्वीकारा असे आवाहन केले आहे .
अमोल बालवडकर हे पहिल्यांदाच ५ वर्षे नगरसेवक राहिले आहेत तर भिमाले हे हे २००२ पासून महापलिकेत नगरसेवक आहेत मध्यंतरी प्रभाग महिला राखीव झाल्याने एकदा त्यांच्या पत्नी २००७ ते २०१२ पर्यंत नगरसेविका होत्या .१२ ते १७ आणि १७ ते २२ पुन्हा भिमाले नगरसेवक राहिलेत.भरत वैरागे आणि इतर त्यांचे सहकारी नगरसेवक प्रभागातून बदलत गेले तरी भिमाले कायम राहिले.