Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

२१ ऑगस्ट रोजी भारत बंद  -एस.सी.,एस.टी. च्या उपवर्गीकरणाला विरोध 

Date:

-पुण्यातील आंबेडकर विचाराच्या संघटनांचा पाठिंबा

पुणे :
अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती च्या उपवर्गीकरण आणि आर्थिक निकषासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात  आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी २१ ऑगस्ट रोजी भारत बंद पुकारला आहे.पुण्यात, अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी  बंद मध्ये सहभागी होऊन निर्णयाविरोधात आक्रोश व्यक्त करणार असल्याची माहिती आज पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. फुले- शाहू -आंबेडकर चळवळीतील   सर्व पक्ष, संघटना यामध्ये सामील होणार आहेतसतीश गायकवाड(अध्यक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय )  ,सचिन गजरमल(अध्यक्ष,संविधान ग्रुप ) , राकेश सोनवणे, विजय कांबळे, विजय जगताप  (जनहित जागृती मंच), सुदीप गायकवाड (बहुजन समाज पार्टी), अनिल सरोदे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.पुण्यातील बुद्धविहार तसेच आंबेडकर जयंती साजरी करणारी मंडळे या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता लुम्बिनी बुद्धविहार (मंगळवार पेठ ) ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यांनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मुध्यावर एस.सी., एस.टी च्या उपवर्गीकरण व आर्थिक निकष लावणेबाबत निर्णय दिला आहे. हा निर्णय भारतीय एस.सी., एस.टी च्या हक्क अधिकार व विषमता व दुफळी निर्माण करणारा असल्यामुळे देशभरातील एस.सी., एस.टी च्या विविध संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात शनिवार दि. २१ रोजी देशव्यापी भारत बंद ची घोषणा केली आहे.

आरक्षणासाठी अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यास मान्यता देतानाच तो अधिकार राज्य सरकारांना देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारी दिला आहे. त्यासाठी उपवर्गीकरणास यापूर्वी अनुमती नाकारणारा आपलाच १९ वर्षांपूर्वीचा निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अधिपत्याखालील खंडपीठाने फिरवला आहे. या नव्या निर्णयाने याच सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हणजेच २००४ साली ई. व्ही. चिन्नय्या वि आंध्रप्रदेश राज्य हा स्वतःच दिलेला पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने दिलेला निर्णय रद्दबातल ठरविला आहे.

आता यावेळी सर्वोच्च न्यायालयात एससी, एसटीच्या आरक्षणाच्या वर्गिकरणाचा मुद्दा होता. तरीही त्यापुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातींना क्रिमीलेअर लावण्याचा निर्णय देऊन टाकला. आरक्षण हे फक्त एका पिढीपर्यंतच ठेवावे, ही मर्यादा कुठलाही संविधानिक आधार नसताना एका न्यायमूर्तींच्या निर्णयात बेमालूमपणे टाकण्यात आली. या सर्व निर्णयाला चळवळीने विरोध केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निकालामागे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या अत्यल्प लोकसंख्या असलेल्या अनेक उपेक्षित अनुसूचित जातींबद्दलचा कळवळा असल्याचे भासू शकते. पण प्रत्यक्षात मात्र, त्यातून अनुसूचित जातींमध्ये आपसात हेवा, आकसाला खतपाणी मिळून त्यांच्यात दुही- – कलह माजण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आरक्षणाचा लाभ प्रबळ अनुसूचित जातीच उपटत असून त्या लाभापासून इतर मायक्रो अनुसूचित जाती वंचित राहिल्या आहेत, अशा तक्रारींचा सूर निघताना दिसत आहे. यासंदर्भात काही जातींनी न्यायसंस्थेकडे दादही मागितली होती हे खरेच. पण त्यांच्या तक्रारीत तथ्य असले तरी आरक्षणाच्या मिळालेल्या लाभाचा समग्र आढावा घेऊन त्याचा लेखाजोखा अधिकृतपणे कुणी कधी मांडला आहे काय ? असा प्रश्न या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला .  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...