पुणे-रक्षाबंधन सण म्हणजे भावाबहिणीचे पवित्र नात्याचे प्रतिक. असा हा सण टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत अगदी आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला. शाळेतील मुलींनी कॉलेज ऑफ मिलिटरी (College of military engineering), खडकी येथे सदिच्छा भेट दिली. जवानांना भेटण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. मुलींनी जवानांना बांधण्यासाठी राखी बरोबर घेतली होती. कॉलेज ऑफ मिलिटरी येथे पोचल्यावर तेथील जवानांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. आपण आणलेली राखी हातात घेऊन मुली प्रत्येक जवानांना कौतुकाने राखी बांधून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक जवानही आनंदाने राखी बांधून घेत होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल सोनल रजपूत, कर्नल प्रशांत जस्साल आणि लेफ्टनंट कर्नल विवेक नेने आवर्जून उपस्थित होते. रक्षाबंधन कार्यक्रमा पाठोपाठ सर्वांनी ऑफिसचा पुर्ण परिसर पाहिला. तसेच सरतेशेवटी एक लघुपट दाखविण्यात आला. जवानांचे जीवन, त्यांचे प्रशिक्षण जवळून पाहून भारावून गेले. शिक्षिका मेघना नेने यांची विशेष मदत झाली.
या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी लेफ्टनंट कर्नल श्री विवेक नेने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी सर्वांचे आभार मानले.