पुणे : बार मध्ये मद्य प्राशन करून जाणारे ग्राहक व्यवस्थित अवस्थेत नसतील तर त्यांना सुखरूप घरी सोडणे अगर त्यांची व्यवस्था करणे तर सोडाच पण पुण्यातील काही बारचे मालक आणि मॅनेजर,वेटर तर ग्राहकाला हीन दर्जाची वागणूक देत बडव बडव बडवत असल्याचे द्सिउन येऊ लागले आहे. असाच एक काहीसा प्रकार पुहे आला आहे,दारु पिऊन परत जाणाऱ्या ग्राहकाने काऊंटरसमोरील ग्रीलला पकडल्याने बार मॅनेजर व त्याच्या दोन साथीदाराने बांबुने मारहाण करुन संबधित ग्राहकाचा पाय फॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत श्रीहरी विलास करंडे (वय ३५, रा. राजीव गांधीनगर, अपर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बार मॅनेजर सिद्धार्थ व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अप्पर कोंढवा रोडवरील एअर किंग बारमध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीहरी करंडे हे त्यांचे मित्र राम इरकले व भैरु माने यांना घेऊन एअर किंग बारमध्ये भर दुपारी दारु पिण्यासाठी गेले होते. तिघांनी दारु प्राशन केली . त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते बाहेर जात असताना फिर्यादी यांचा तोल जात असल्याने त्यांनी काऊंटरसमोरील ग्रीलला पकडले. त्यावेळी काऊंटरवरील दोन कामगारांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील एकाने लाकडी बांबुने त्यांच्या डाव्या पायावर मारहाण केली. दुसर्याने सिद्धार्थला बोलावून घेतले. सिद्धार्थ याने फिर्यादीच्या मित्रांना बाहेर काढून ग्रील लॉक करुन फिर्यादी यांना पुन्हा लाकडी बांबु व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा त्यांच्या मित्रांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी फिर्यादी यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मारहाणीत त्यांच्या डावा पाय तीन ठिकाणी फॅक्चर झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत.
असे का होते ?
मद्य प्राशन करणारे ग्राहक एक तर मद्याच्या आहारी गेलेले असतात ,किंवा हौसेच्या आहारी असतात , आणि एकदा का बिल वसूल झाले कि , पोलिसांची आणि अशा बार चालकांची असलेली ओळख ,नियमित होणारी भेट हि ग्राहकाच्या नशिबी बहुधा नसते . या सर्वाचा परिणाम बार चालकांची वृत्ती विनम्रते ऐवजी त्यांना मुजोरीकडे वळविते