श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे व ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र तर्फे शिबीराचे आयोजन ; परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची उपस्थिती
पुणे : श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे व ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र तर्फे शनिवार पेठेतील नविन मराठी शाळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पथकातील वादकांसह पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबीरात २२० जणांनी रक्तदान केले.
यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहितदादा टिळक, जनकल्याण रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, पोलीस मित्र राजाभाऊ कदम, नगरसेवक गायत्री खडके- सूर्यवंशी, माजी नगरसेवक हेमंत रासने, लघुउदयोग भारती प्रमुख मनोज धारप, मनसे उपशहर अध्यक्ष आशिष देवधर, ढोल ताशा महासंघाचे अनुप साठ्ये व शिरीष थिटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे सहकार्यवाह मंगेश घाटपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमात पहिल्यांदा रक्तदान करणा-या युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन सौरभ हिर्लेकर, प्रथमेश बोडस, कुणाल श्रोत्री आणि रोहन गोळे यांनी केले.