पुणे- महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे प्रकार वाढले असून प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी करत आयुक्तांवर दबाव टाकून अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करत आपल्या मर्जीतले अधिकारी महत्वाच्या पदांवर बसविण्याचे षड्यंत्र सुरु आहे . या पार्श्वभूमीवर आता माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी आयुक्तसाहेब, कुणाच्या तरी दबावाने महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा पायंडा पाडू नका असे आवाहन केले आहे.
या संदर्भात केसकर, कुलकर्णी, बधे यांनी म्हटले आहेकी,’महानगरपालिकेचे काही डॉक्टर आणि काही संघटना या एका महिला अधिकाऱ्याला डॉक्टरला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे.कामामध्ये त्रुटी असेल तर त्यावर कार्यवाही करण्याचे निश्चित अधिकार आहेत त्यामध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप यापूर्वी केला नाही पुढेही करणार नाही.या प्रकरणांमध्ये डॉक्टर मनीषा नाईक यांचा पदभार अन्य काही अधिकाऱ्यांना हवा आहे त्यासाठी महानगरपालिकेचे काही कागदपत्र माहितीच्या अधिकारात न मागता देखील दिली गेली आणि त्या आधाराने काही कार्यवाही प्रस्तावित केली त्याबाबतही काही आक्षेप नाही
डॉक्टर मनीषा नाईक यांचा खुलासा मान्य केला पाहिजे असाही आमचा आग्रह नाही एकच म्हणणे आहे कुठल्या संघटना जर दबाव आणून एका अधिकाऱ्याची बदली करणार असतील मुदतपूर्व तर एक वेगळा पायंडा या महानगरपालिकेमध्ये पडेल आणि ज्या संघटनाने बदलीसाठी प्रयत्न केले बातम्या छापून आणल्या त्यांच्या दबावांमध्ये पुढील काळात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना काम करावे लागेल असे आम्हाला वाटते.तरी आमची आपणास विनंती आहे की याबाबत निपक्षपाती चौकशी होणे आवश्यक आहे .”चौकशी हाताखालच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याची करावी हे बरोबर नाही चौकशी हा फार्स आहे असे वाटू शकते.”आपण याबाबत स्वतः लक्ष घालून अधिकाऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा ही प्रशासक आणि कुटुंब प्रमुख म्हणून आमची आपणाकडून अपेक्षा आहे.