~ स्थानिकहवामानासाठीयोग्यबियाणेविकसितकरणारेसंशोधनआणिविकासकेंद्रस्थापनकरणार
~ पामतेलउत्पादकांना सर्वसमावेशक साहाय्यदे ण्यासाठी समाधान हे सोल्युशन सेंटर उघडणार
धलाई, त्रिपुरा – गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (GAVL) आज घोषणा केली की, त्यांच्या पाम ऑइल प्लांटेशन व्यवसाय (OPP) त्रिपुरामध्ये पाम ऑइल प्रोसेसिंग मिलिंगची स्थापना करणार आहे. राज्यातील धलाई जिल्ह्यात हा प्रकल्प असेल. त्यासाठी कंपनी सध्या वर्षाला ३ लाख क्षमतेची रोपवाटिका चालविते आणि ती प्रतिवर्षी ५ लाखांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. पामसाठी परिसरात प्रगत संशोधन आणि विकास केंद्रही स्थापित करण्याबरोबच कंपनी पाम शेतकऱ्यांना सर्वसमावेशक साहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने समाधान केंद्र हे एक-स्टॉप सोल्युशन सेंटर सुरू करण्यात येईल.
त्रिपुराचे माननीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री रतन लाल नाथ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेचमिल आणि आर अँड डी सेंटरच्या भूमिपूजन समारंभाला एसडी गुथरी प्लांटेशन्स, मलेशियाचे संशोधन आणि विकासप्रमुख डॉ. हरिकृष्ण कुलवीरासिंगम उपस्थित होते. पाम ऑइल क्षेत्राचा अभ्यास आणि डीकोडिंग करण्याच्या दोन दशकांहून अधिक अनुभवासह, ते उच्च उत्पन्न देणारे शाश्वत पाम तेल विकसित करण्यासाठी कंपनीला मार्गदर्शन करतील.
ऑगस्ट 2021 मध्ये खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन – ऑइल पाम (NMEO-OP) सुरू केल्यानंतर त्रिपुरा सरकारने किमान 7,000 हेक्टर जमीन पाम लागवडीखाली आणण्याची योजना सुरू केली आहे.
यावेळीभाष्यकरतानात्रिपुराचेमाननीयकृषीआणिशेतकरीकल्याणमंत्रीआ, रतनलालनाथम्हणाले, “खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन – ऑइल पाम (NMEO-OP) च्या यशस्वितेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत त्रिपुरा सरकार एक अशी इको-सीस्टम तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे, जी राज्यातील पाम तेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आणि जमिनीचा वापर करून राज्यात पाम ऑइल प्रोसेसिंग मिल सुरू झाल्यामुळे आमचे शेतकरी आता गोदरेज ॲग्रोव्हेटसारख्या विश्वासू आणि विश्वासार्ह भागीदारांसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या कौशल्याचा फायदा यात होईल. राज्यातील पाम तेल शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी समाधान केंद्र स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय केवळ सध्याच्या पाम तेललाच नव्हे, तर पाम तेल उत्पादकांनाही मदत करेल, ज्यामुळे राज्याच्या क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास दिसून येईल.”
गोदरेजॲग्रोव्हेटलिमिटेडचेव्यवस्थापकीयसंचालकबलरामसिंहयादवम्हणाले, “पाम तेल शेतकऱ्यांच्या उत्थानाच्या आमच्या सामाईक मिशनसाठी त्रिपुराच्या मनापासून पाठिंब्यासाठी आम्ही शासनाचे आभारी आहोत. त्यांच्याद्वारे निर्माण होत असलेली अनुकूल इको-सीस्टम खरोखरच उत्साहवर्धक आहे.”
“आम्हाला खात्री आहे की, आजच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट आमच्याकडे विकण्यास मदत होईलच, शिवाय रोजगार निर्मिती आणि व्यवसायाच्या संपूर्ण मूल्य शृंखलेशी संलग्न व्यवसायांना चालना मिळण्यास मदत होईल. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या तीन दशकांहून अधिक काळातील कौशल्याचा लाभ घेऊन, राज्याचा पाठिंबा आणि विश्वास या क्षमतेमुळे आम्हाला पाम तेलच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या देशाच्या प्रवासात योगदान देण्याची संधी नक्कीच मिळेल,” असेही ते पुढे म्हणाले.
संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याच्या निर्णयावर भाष्य करताना, गोदरेजॲग्रोव्हेटलिमिटेडच्यापाम ऑइलप्लांटेशनबिझनेसच्यासीईओसौगतनियोगीम्हणाले, “नफ्यापूर्वी शाश्वतता कायम ठेवणारी संस्था म्हणून, पाम तेल लागवडीच्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने आम्ही या भागात प्रगत संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे आमची शास्त्रज्ञांची टीम स्थानिक हवामान आणि राज्याच्या हवामानासाठी योग्य बियाणे विकसित करण्यासाठी जीनोमिक्स करत आहेत. या केंद्रातून देशाच्या इतर भागांमध्ये नवनवीन शोध घेऊन जाण्याची आम्हाला आशा आहे.”
यावेळी त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेच्या कृषीचे कार्यकारी सदस्य भाभा रंजन रेआंग; करमचेराचे विधानसभा सदस्य पॉल डंगशू; चावमानूचे विधानसभा सदस्य संभूलाल चकमा; त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदचे एमडीसी बिमल कांती चकमा; त्रिपुरा सरकारीमधील कृषी सचिव अपूर्वा रॉय; एसडी गुथरी प्लांटेशन्स, मलेशियाचे डॉ. हरिकृष्ण कुलवीरासिंगम; मनु ब्लॉकचे उपाध्यक्ष प्रणॉय देबबर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) ही भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण अन्न आणि कृषी व्यवसाय समूहांपैकी एक आहे, तसेच भारतातील पाम ऑइल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. 2027 पर्यंत पाम लागवडीचा विस्तार 1.2 लाख हेक्टरपर्यंत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन शाश्वत विकासास समर्थन देण्यासाठी भारतातील कंपनीने गेल्या वर्षी समाधान, एक-स्टॉप सोल्युशन सेंटर सुरू केले. प्रत्येक समाधान केंद्राच्या माध्यमातून ~2,000 हेक्टर पामच्या लागवडीस पाठिंबा देण्याचा मानस आहे आणि अत्याधुनिक कृषी पद्धतींचा लाभ घेऊन व उद्योग तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन प्रदान करून परिपक्व लागवडीतून जास्तीतजास्त उत्पादन मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीची स्टेट बँक ऑफ इंडियासोबतची भागीदारी लागवडीच्या काळात पाम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करेल.
आज जाहीर केलेल्या उपक्रमांद्वारे, कंपनी 2027 पर्यंत त्रिपुरामध्ये पाम लागवडीखालील क्षेत्र 10,000 हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस आहे.