शाण्डिल्य प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचा उद्धाटन सोहळा
पुणे ः आपण केलेल्या कार्याला परंपरेबरोबरच आधुनिकतेची देखील जोड असली पाहिजे. तर ते कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल. आज परंपरेला आधुनिकतेची जोड देवून कौशल्य विकासाचे उपक्रम राबविले तर शाण्डिल्य प्रतिष्ठानसारख्या स्वयंसेवी संस्था देखील देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतील, असे मत जेष्ठ शिक्षण तज्ञ डाॅ. न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील श्री नृसिंह मंदिरात शाण्डिल्य प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे उद्घाटन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजीवनी मुजुमदार, जेष्ठ मोडी लिपी तज्ञ व प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त प.क.जोशी, कार्याध्यक्ष रविंद्र जोशी आदी उपस्थित होते. यावेळी प.क.जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, या नृसिंह मंदिरात वासुदेव बळवंत फडके हे तप करण्यसाठी येत होते. परपरेबरोबरच मंदिरात इतिहास देखील जपला जातो. देवळात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवून परमेश्वरासमोर नतमस्तक होतात. त्यामुळे देवालये ही फक्त धार्मिक नाहीत तर समाज मंदिरे आहेत, असेही त्यांनी सांगितले. प्रसाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. महेश जोशी यांनी प्रास्ताविक व वसंत जोशी यांनी आभार मानले.

