पुणे- पुण्यातून जाणाऱ्या मुठा आणि मुळा या दोन्ही नद्यांतून मोठा विसर्ग धरणामधून होऊ लागला असून मुळा मुठा संगमाच्या जवळ आणि तेथून पुढे नदी ओथंबून वाहू लागली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून दुपारी १२.०० वाजता २७ हजार १६ क्यूसेक करण्यात आलेला आहे.तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन सायं ७:०० वा. २७ हजार ६०९ क्युसेक्स करण्यात आला आहे.
दरम्यान भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून धरण १०० टक्के भरले आहे. नदीपात्रात सुरू असणाऱ्या १३ हजार ५३१ क्युसेकमध्ये वाढ करुन सायं.५.३० वा. विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १ हजार ६६१ आणि सांडव्याद्वारे १५ हजार ४०० क्युसेक असा एकूण १७ हजार ६१ क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत , वरसगाव , टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात संध्याकाळी ५ वाजता एकूण 27.14 TMC म्हणजे 93.11% पाणी साठा जमा झालेला होता.
निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करून ठीक रात्री ८ वा. विद्युतगृहाद्वारे ७५० क्युसेक व धरणाच्या सांडव्याद्वारे ४ हजार ७६३ क्युसेक असा एकूण ५ हजार ५१३ क्युसेक नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे यो. स. भंडलकर,सहाय्यक अभियंता, श्रेणी १, निरा पाटबंधारे उपविभाग, निरा यांनी कळविलेले आहे.