मुंबई-आज एक ऑगस्ट रोजी सह्याद्री विश्रामगृहवर सांस्कृतिक राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिनेपत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांची एक महत्त्वाची बैठक भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे आयोजित केली होती.
या बैठकीत त्यांच्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा झाली. पत्रकारांना आधीस्वीकृती पत्र, त्यांना सांस्कृतिक समितीमध्ये सहभाग, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांमध्ये सरकारतर्फे आमंत्रण, पत्रकारांना घरासाठी विशेष कोटा,.इतर अनेक मागण्या होत्या.
या कार्यक्रमात अनेक सिने पत्रकार आणि चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यामध्ये शितल कर्देकर,( ग्लोबल टाइम्स/ ठाणे टाइम्स) मंदार जोशी( तारांगण), सौम्या बाजपेयी (हिंदुस्तान टाइम्स ) राजेश शिरभाते ( गावकरी) संतोष भिंगार्डे ( सकाळ) श्रेयस सावंत (पुढारी ) मंगेश दराडे (सामना ) चेतन काशीकर( न्यूज नेशन) सचिन चिटणीस( 24/7 चैनल) निलेश अडसूळ (लोकमत फिल्मी )सुरज खराटमल( रत्न मराठी) वैभव बागकर( चित्रपट समीक्षक/ मुक्त पत्रकार)शैलेश मयेकर (महाराष्ट्र टाइम्स ) इत्यादी पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे करण्यात आले होते.या कार्यक्रमात श्री विजय हरगुडे ( अध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा ), हेनल मेहता (सह प्रभारी चित्रपट आघाडी ) समीर दीक्षित अध्यक्ष (भाजपा चित्रपट आघाडी ) राकेश ठाकूर सरचिटणीस चित्रपट आघाडी इत्यादी उपस्थित होते
श्री विजय हरगुडे यांनी व्यक्तिशः पाठपुरावा करायचे ठरवून पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता मंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा करतील असे सांगितले.
समीर दीक्षित म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून सिने पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांची बैठक झालेली नव्हती आणि मुनगंटीवार यांनी या प्रश्नांकडे व्यक्तिगत नोंद घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे भाजपा चित्रपट आघाडीला कळविले आहे. सर्व पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांनी भाजपा चित्रपट आघाडीचे विशेष आभार मानले असून चित्रपट आघाडीला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे