नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची विविध मंडळांना भेट आणि शुभेच्छा
पुणे-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती कोथरुड मध्ये उत्साहात साजरी झाली. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त कोथरुड मधील विविध संघटना आणि मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन सर्वांना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उद्योजक समीर पाटील, सरचिटणीस विठ्ठलआण्णा बराटे, गिरीश खत्री, प्रा. डॉ. अनुराधा एडके, दीपक पवार, नवनाथ जाधव, प्रशांत हरसुले, रणजीत हरपुडे, प्रदीप जोरी, ॲड. प्राची बगाटे, कैलास मोहोळ, रमेश चव्हाण, सुहास साठे, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
यात प्रामुख्याने श्रावणधारा वसाहत-डीपी रोड, शास्त्रीनगर चौक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समिती कोथरुड, समाजसुधारक मंडळ-जय भवानीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान -मोरे विद्यालय, जय लहुजी शक्तीसेना केळेवाडी, मातंग युवा संघटना केळेवाडी, जय जवान मित्र मंडळ-डीपी रोड, आदी मंडळांना भेट देऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
अण्णाभाऊ साठे यांचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून कामगार वर्गामध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण केला. महाराष्ट्र शासन मातंग समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र (आर्टी)ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे मातंग समाजाला मोठा दिलासा मिळाला असून यामुळे मातंग समाजाच्या उन्नतीसाठी ही स्थापना मैलाचा दगड ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

