स्वप्नीलचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. 28 वर्षीय स्वप्नील 2012 पासून आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. 2024 मध्ये त्याने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले. स्वप्नीलने याआधी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.स्वप्नीलचा आदर्श एमएस धोनी आहे. धोनीप्रमाणेच स्वप्नीलही मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. धोनीप्रमाणेच स्वप्नीलही शूटिंगच्या मैदानात शांत राहतो. स्वप्नीलची आई कांबळवाडी गावच्या सरपंच आहे. वडील आणि भाऊ शिक्षक आहेत.
पॅरिस-पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारताला तिसरे पदक मिळाले. नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावले. स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवले. विशेष म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तिन्ही पदके नेमबाजीतच जिंकली आहेत.
2015 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत स्वप्नील कुसळेने 50 मीटर रायफल 3 प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 59 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत गगन नारंग आणि चेन सिंग या नेमबाजांना पराभूत केले आहे.पदक जिंकल्यानंतर स्वप्नील म्हणाला, ‘मी देशासाठी पदक जिंकले याचा मला खूप आनंद आहे. फायनलच्या वेळी मी खूप घाबरलो होतो, माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते.
2015 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत स्वप्नील कुसळेने 50 मीटर रायफल प्रोन 3 प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय गगन नारंग आणि चेन सिंग यांसारख्या बड्या नेमबाजांना पराभूत करून तुघलकाबाद येथील 59 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा जिंकली आहे.
आई सरपंच, वडील शिक्षक
स्वप्नीलने 2012 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली. त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई कांबळवाडी गावची सरपंच आहे. नववीत असताना त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली होती. पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने 10 पैकी नऊ शॉट्स अचूक मारले. तेव्हा त्याला बंदुकही माहित नव्हती असे त्याचे वडील सांगतात.
वडिलांनी काढले होते कर्ज
शिवाय पिस्तुल हा खर्चिक खेळ आहे आणि त्याचे दडपण वडिलांनी कधीच स्वप्नीलवर येऊ दिले नाही. ते सांगतात,”2012 मध्ये त्याची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली आणि तेव्हा मी दीड लाखाचं कर्ज घेऊन त्याला पाठवलं. त्या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पण, त्याने पुन्हा कसून सराव केला आणि 2015 मध्ये 18 पेक्षा कमी वय असताना केरळमध्ये खुल्या गटात रौप्यपदक जिंकले”.
यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये पटकावले विजेतेपद
दरम्यान, यापूर्वी 2022 मध्ये स्वप्नीलने 22 ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो इथं झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा बर्थ जिंकला होता. 2023 मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, 2022 मध्ये बाकू येथील विश्वचषक आणि 2021 मध्ये नवी दिल्ली इथं नेमबाजीत स्वप्नील हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. याशिवाय त्याने 2015 ते 2023 या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत.

