Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुनेला पाडले, आता पुतण्याची बारी.. बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले..

Date:

बारामती,हडपसर ,वडगाव शेरी,मावळासह 20 विधानसभा मतदारसंघातून नवीन आमदार निवडून आणणार

3 ठिकाणी उमेदवारी घोषित-बंडखोर आमदारांविरोधात दंड थोपटले

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळाली. तशीच पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उडी घेतली आहे. ज्या आमदारांनी बंडखोरी केली, त्यांना धडा शिकवण्यासाठी व त्यांच्या विरोधात युवकांना संधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच जवळपास 20 विधानसभा मतदारसंघ हेरले आहेत.

पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले असून प्रमुख 20 विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये, धनंजय मुंडेंच्या परळी, हसन मुश्रीफ यांच्या कागल, दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर, आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील 20 मतदारसंघात चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यानंतर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत महायुतीत सहभाग घेतला. मात्र, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या हिंमतीने अजित पवारांविरुद्ध लढा दिला. लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. त्यामध्ये, बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे, आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवयुवकांना संधी देण्याची रणनीती आखली जात आहे.

या मतदारसंघात मिळेल युवकांना संधी

बारामती – आमदार अजित पवार

वडगाव शेरी – आमदार सुनील टिंगरे

हडपसर – आमदार चेतन तुपे

मावळ – आमदार सुनील शेळके

आंबेगाव – आमदार दिलीप वळसे पाटील

इंदापूर – आमदार दत्तात्रय भरणे आहे.


अहेरी – धर्मारावबाबा आत्राम
आष्टी – आमदार बाळासाहेब आसबे
दिंडोरी – आमदार नरहरी झिरवळ
गेवराई – भाजपचा आमदार आहे
श्रीवर्धन – आमदार अदिती तटकरे
पुसद – आमदार इंद्रनील नाईक
अळमनेर – आमदार अनिल पाटील
उदगीर -(अ.जा.) आमदार संजय बनसोडे
अणुशक्ती नगर – आमदार नवाब मलिक
परळी – आमदार धनजंय मुंडे
कागल – आमदार हसन मुश्रीफ
सिन्नर – आमदार माणिकराव कोकाटे
तुमसर – आमदार राजू कोरमोरे
फलटण – (अ.जा) आमदार दीपक चव्हाण .

शरद पवार यांना उतारवयात आधार हवा असताना दगा दिल्याने आता या वयातही त्यांनी दगबाजांना योग्य जागा दाखविण्यासाठी मैदानात उडी घेतल्याने त्यांच्या लढतीबाबत उत्सुकता वाढत राहणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...