पुणे- आजचा सकाळी 6वा पानशेत:94.11% भरल्याने दुपारी १ वाजता पानशेत मधून विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारेला घ्यावा लागला त्याच बरोबर खडकवासला:76.37% भरलेले होते त्यामुळे खडकवासल्यातूनही दुपारी ३ वाजता विसर्ग सुरु करावा लागला . तर वरसगाव दुपारी 4:00 वाजता 80 % टक्के भरल्याने आता वरसगाव धरणातूनही कधीही विसर्ग सुरु करावा लागेल अशी स्थिती आहे.पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा सकाळीच दिलेला आहे.
आज दुपारी. 1.00 वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 4712 क्यूसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज दुपारी. 3.00 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 5136क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये सुरू असणारा 5136 क्युसेक विसर्ग वाढवून रात्री 8 वा. 7704 क्यूसेक करण्यात येईल ..
आजचा पाणीसाठा(सकाळी 6वा.)
खडकवासला:76.37%
पानशेत:94.11%,वरसगाव:79.12% टेमघर :77.58%
एकूण:84.22%_24.55TMC
आजचा पाणीसाठा(सायंकाळी ५ वाजता .)
खडकवासला:81.43%
पानशेत:95.43%,वरसगाव:80.25% टेमघर :77.99%
एकूण:85.59%_24.95TMC

