Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सिहंगडरोड परिसरात बीव्हीजीचे  मिशन “डीप क्लीन”

Date:

मुख्यमंत्र्याच्या सूचनेनंतर १०० कर्मचाऱ्यांची मोफत स्वच्छता सेवा

पुणे (प्रतिनिधी) :  कोसळधार पावसामुळे सिंहगड रोड परिसरातील आनंद नगर व एकता नगर परिसरात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. पहाटेच्या वेळेला घरात पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी ओसरल्याने पार्कीग, बाथरूम व टॉयलेटमध्ये  चिखलाचा थर जमा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेने सामना करावा लागत आहे. सदर परिसर “डीप क्लीन” करण्यासाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) कंपनीची मदत घेण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाला केली होती. मुख्यमंत्र्याच्या सूचनेची अमंलबजावणी करण्यासाठी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासातच १०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी या भागात पाठवले आहेत. घरातील सदस्य असल्याप्रमाणे स्वच्छता कर्मचारी नागिरकांना स्वच्छता सेवा देत आहेत. सदर स्वच्छता सेवा पुढील चार दिवस राबवण्यात येणार असून यासाठी कोणताही मोबदला घेण्यात येणार नाही.

सोसायटी व रहिवासी परिसर स्वच्छ करण्यासाठी बीव्हीजीच्या वतीने ट्रक माउंटेड जेट मशीनचा वापर करण्यात आहे. या मशीनमुळे पार्कीग, टॉयलेट व बाथरूममध्ये साठलेला चिखल काढला जातो आहे. घरात पाणी शिरल्याने लाकडी फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लाकडी फर्निचर स्वच्छ करण्याचे काम बीव्हीजी कर्मचारी करत आहेत.

पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने जीवनउपयोगी असलेल्या अनेक बाबी निरऊपयोगी झाल्या आहेत. निरऊपयोगी झालेल्या बाबी ट्रकमध्ये भरून देण्यासाठी सुद्धा बीव्हीजीचे कर्मचारी मदत करत आहेत.
स्वछता हीच सेवा
मानवतावादी दृष्टीकोनातून बीव्हीजी परिवार स्वच्छता सेवेचे काम करत आहे. मुसळधार पावसामुळे बाधीत झालेल्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मुख्यमंत्री यांनी बीव्हीजी परिवाराला दिली. पुढील चार दिवस बीव्हीजी परिवार या परिसरात स्वच्छता सेवा देणार आहे.

हणमंतराव गायकवाड
चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक (बीव्हीजी)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...