नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती
कोथरूड मधील पूरग्रस्त भागांची पाहणी
पुणे दिनांक 26: पुण्यात बुधवारी मध्यरात्रीपासून झालेला पाऊस हा असाधारण होता. नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने, नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले. पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. शासनस्तरावर पंचनामे होऊन, लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (शुक्रवारी) दिली.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी कोथरूड मधील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यात प्रामुख्याने कोथरुड मधील रजपूत वीटभट्टी, राजर्षी शाहू वस्ती, प्रतिज्ञा मंगल कार्यालय- एरंडवणे, स्पेन्सर चौक- कर्वेनगर, सोमेश्वर वाडी, बाणेर मधील दत्तनगर, प्रथमेश पार्क, भीमनगर बालेवाडी आदी भागांतील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन, नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर भाजप कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, , नगरसेवक दीपक पोटे, राजाभाऊ बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी, जयंत भावे, सुशील मेंगडे, मंडल सरचिटणीस दीपक पवार, डॉ. अनुराधा एडके, ॲड. प्राची बगाटे, अपर्णा लोणारे, राज तांबोळी, प्रशांत हरसुले, महेश पवळे, दत्ता चौधरी, राजू मोरे, कल्पना पुरंदरे, यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांशी संवाद साधताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुणे शहरात बुधवारी मध्यरात्रीपासून झालेला पाऊस हा असाधारण होता. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. तर, नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. २०१९ च्या शासन आदेशानुसार सर्वांना लवकरच मदत मिळेल.
वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. त्यासाठी निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देश ही नामदार पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
ते पुढे म्हणाले की, संकटाच्या काळात भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम केले. कोथरुड मधील नागरिकांना जेवण- नाश्त्याची सर्व व्यवस्था केली. तसेच, रात्री ब्लँकेट देखील देण्यात आले. आता ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची माहिती घेऊन, त्या सर्वांना लोकसहभागातून मदत केली जाईल, असे आश्वास्त केले.
दरम्यान, पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांना जे जे मदत कार्य करणे शक्य आहे; ते ते करण्याच्या सुचना नामदार पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच, पूरग्रस्त भागांच्या स्वच्छतेसह गरजू नागरिकांना औषधे, धान्य, कपडे, आदी पुरवाव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

