पुरपरिस्थितीमुळे महावितरण ‘हाय अलर्ट’वर, वीजयंत्रणा व अनेक सोसायट्यांमधील मीटरबॉक्स पाण्यात,सुमारे ८४ हजार ६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Date:

पुणे, पिंपरी शहरात अनेक ठिकाणी सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद; अतिवृष्टीचा वीजयंत्रणेला फटका

पुणे, दि. २५ जुलै २०२४:पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह प्रामुख्याने मुळशी, मावळ, खेड तालुक्यांमध्ये अभूतपूर्व अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा वीजयंत्रणा फटका बसला आहे. वीजयंत्रणा व अनेक सोसायट्यांमधील मीटरबॉक्स पाण्यात असल्याने विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून १३ वीजवाहिन्यांसह ६९९ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे वीजयंत्रणा नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे विविध भागातील सुमारे ८४ हजार ६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

वीजयंत्रणेत बिघाड झाला आहे त्याठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र गुरुवारी (दि. २५) दुपारी उशिरापर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने दुरुस्ती कामात मोठे अडथळे येत होते. तसेच पाण्यात असलेली वीजयंत्रणा तसेच सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद ठेवलेल्या सोसायट्या किंवा परिसरातील वीजपुरवठा पाण्याचा निचरा झाल्यानंतर व पाहणी करून सुरु करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अतिवृष्टी तसेच खडकवासला धरणातून गुरुवारी (दि. २५) पहाटेपर्यंत 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे प्रामुख्याने नदीकाठच्या परिसरात व सोसायट्यांमध्ये व मीटर बॉक्समध्ये पाणी शिरले. यामुळे प्रामुख्याने सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, पुजापार्क, गायत्री अपार्टमेंट, जलतरंग अपार्टमेंट, राधाकृष्ण रेसिडेन्सी, कुदळे पाटील, द्वारका अपार्टमेंट, आनंद पार्क, स्काय अपार्टमेंट, साई अपार्टमेंट, सिद्धी अपार्टमेंट, जलपुजन अपार्टमेंट, शामसुंदर अपार्टमेंट आदींसह हिंगणे, किरकटवाडी, स्वारगेट, धायरी, वडगाव, नवी पेठ आदी भागातील सुमारे ३८ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यासोबतच शहरातील वडगाव शेरी, नगररोड, विश्रांतवाडी परिसरातील १७ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

शिवाजीनगरमध्ये चव्हाणनगर, बालाजीमंदिर, बिवर्ली हिल्स, वाकडेवाडी परिसर, शिंदे गार्डन, अयोध्यानगरी, सिंध सोसायटी, खडकीमधील राजीव गांधीनगर व परिसर, रास्तापेठ, भवानीनगर, जुनाबाजार, मेलवानी कंपाऊंड, मनीष पार्क सोसायटी, कोंढवा, पिसोळी रोड, खडी मशीन चौक, वानवडी, वारजे, कर्वेनगर आदी भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच काही भागात झाडाच्या फांद्या व फिडर पिलरमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.

वीजयंत्रणेत पाणी शिरल्यामुळे निगडी येथील घरकूल व ओटा स्कीमचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सेक्टर चारमधील मातोश्रीनगर, रावेत येथील नदीकाठचा परिसर, सांगवी, हिंजवडी, दापोड, खराळवाडी आदी भागातील सुमारे ५५ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे प्रामुख्याने मावळ व मुळशी तालुक्यातील वीजयंत्रणेला फटका बसला आहे. मुळशी तालुक्यात ३० ते ४० वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे १०५ रोहित्रांवरील १० ते १२ गावांचा व सुमारे २६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच मुळा नदीकाठच्या परिसरात भुकूम, भुगाव, माण व मारुंजी गावांतील २९ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला.

आळंदी शहरात इंद्रायणी नदीचे पाणी शिरल्याने दोन रोहित्रांचा तसेच वडगाव शिंदे गावाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाईट येथे दोन वीजखांब पडल्याने दोन गावांचा तसेच कामशेत, लोणावळा, कार्ला, वडगाव, तळेगाव परिसरातील १८ ते १९ गावांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा धोका कमी झाल्यानंतर या गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड व हिंगणे परिसरात वीजयंत्रणेला फटका बसला. या भागात मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी पाहणी केली

महावितरण ‘हाय अलर्ट’वर – पुणे परिमंडल अंतर्गत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे सुरळीत वीजसेवा व वीज सुरक्षेसाठी महावितरण ‘हार्य अलर्ट’वर आहे. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी पहाटेपासूनच दर तासाला वीजपुरवठ्याचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी सतर्क व ऑन फिल्ड राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुख्य अभियंता श्री. पवार यांनी आज हिंगणे, डेक्कन, विश्रांतवाडी आदी परिसरात विविध ठिकाणी भेटी देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली. तसेच वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांबाबत निर्देश दिले. यावेळी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. पुरस्थितीमुळे अत्यंत खडतर परिस्थितीत बुधवारी (दि. २४) रात्रीपासून भर पावसात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंता, कर्मचारी राबत आहेत. काही ठिकाणी झाडे व मोठ्या फाद्या पडल्याने वीजयंत्रणा नादुरुस्त झाली. त्यामुळे रात्रभर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु होते. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा उपसा करून वीजयंत्रणेच्या दुरुस्तीच कामे करावी लागत आहेत. अतिवृष्टी व पुराच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य...

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...