पुणे, दि. २२ : पुणे जिल्ह्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मुलांचे १ व मुलींचे १ असे एकूण २ शासकीय वसतिगृहे मंजूर करण्यात आली असून पुणे परिसरातील खासगी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुल्यांकन दराने इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
इच्छुक इमारत मालकांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, येरवडा पोलीस ठाण्याच्या समोर, विश्रांतवाडी, पुणे-६ या कार्यालयात संपर्क साधून संमती अर्ज व विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक विशाल लोंढे यांनी केले आहे.

