पुणे- कात्रजच्या चौकातील वाहतूक समस्या गेली असंख्य वर्षे स्वतःचा गाजावाजा करणार्यांसह अनेकांना सोडवता आलेली नाही ती सोडविण्याचे प्रयत्न होत असताना काल बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रजला भेट दिली आणि याचवेळी मुस्लीम समजाच्या काही जणांनी त्यांची भेट घेऊन महापालिकेच्या अजब कारभाराचा गजब नमुना प्रत्यक्षात जागेवर नेऊन दाखविला .तिथे सुळे यांच्या लक्षात आणून देण्यात आला. या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ‘कात्रज, पुणे येथे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी सन २००० साली महापालिकेच्या वतीने जागा देण्यात आली आहे. या जागेची पाहणी केली. दफनभूमीसाठी जागा देण्यात आली परंतु दफनभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्यात आला नाही. याबाबत वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. तसेच महापालिकेने पाहणी देखील केली आहे. परंतु तरीही येथे अद्याप रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.मुस्लिम बांधवांना अंत्यविधी पार पाडताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता महापालिका आयुक्तांनी स्वतः याप्रकरणी लक्ष घालून दफनभूमीसाठी रस्ता उपलब्ध करुन देण्याबाबत उचित कार्यवाही करावी.
अबब तब्बल २४ वर्षे कात्रजच्या दफनभूमीला जाण्यासाठी महापालिकेने रस्ताच दिला नाही- अजब कारभाराचा गजब नमुना
Date:

