पुणे- पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारल्याची घटना 6 जुलैला धनकवडीतील चव्हाणनगरमध्ये घडली आहे. दरम्यान, पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करणार्या पतीचे सहकानगर पोलिसांनी चौकशीत बनाव उघडकीस आणला आहे. याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/०७/२०२४ रोजी महीला नामे अंजना ऊर्फ अंजली बापू खंडाळे ऊर्फ अंजली स्वप्नील मोरे वय २९ वर्षे रा.तीन हत्ती चौक, धनकवडी पुणे. (महिला) हि राहते घरी बेशुध्द अवस्थेत असले बाबत तीस तीचे नातेवाईकांनी भारती हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिस मयत घोषीत केले होते. उपस्थित नातेवाईकांनी सदर महीलेने फाशी घेतली आहे अशी खबर भारती हॉस्पीटल येथुन आल्याने मयत बॉडीचे पोस्ट मॉर्टेम केले होते.
दाखल मयत महिलेच्या मृत्यु बाबत संशय आल्याने वरिष्ठांना सदर बाबत संपुर्ण माहीती देवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर मयत महीलेच्या मृत्युची चौकशी सुरु केली. दाखल अकस्मात मयताची चौकशी करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, महेश मंडलिक यांनी गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त केली की, मयत महिलेच्या पतीने कौटुंबीक वादातुन पत्नीचा गळा आवळुन खुन करुन नंतर तिस फासावर लटकवुन निघुन गेला आहे. व आपण काही केले नाही अशा अविरभावात वावरत आहे अशी माहिती मिळाली.
सदर बाबत वरिष्ठांनी तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक युवराज पोटरे व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन चौकशी करण्याचे आदेश दिले. सदर मयत महिलेचा पती नामे स्वप्नील शिवराम मोरे यास ताब्यात घेवुन त्याला विश्वासात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी करता त्याने गुन्हयाची कबुली दिली व सांगितले की, माझी मयत पत्नी अंजली हिच्या चरित्र्या बाबत संशय असल्याने त्याचा राग मनात धरुन मी दिनांक ०६/०७/२०२४ रोजी राहते घरात नायलॉन दोरीने तिचा गळा आवळुन तिस जीवे ठार मारुन तीला नायलॉन दोरीने छताला लटकवुन गळफास घेतल्याचा बनाव केला असे सांगीतलेवरुन सदर मयत महीलेचा खुन तीचा पती स्वप्नील शिवराम मोरे वय ३० वर्षे रा. घोरपडी पेठ, पुणे यानेच केला असल्याचे निष्पन्न झालेवरुन सदर बाबत सहकारनगर पोलीस ठाणे गु.र.नं.२३७/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करुन दाखल गुन्हयात त्यास दि.१२/०७/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती नंदीनी वग्यानी पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, रेश्मा साळुंखे, सहा. पोलीस उप-निरीक्षक सोपान नावडकर, बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, महेश मंडलिक, सागर सुतकर, विशाल वाघ, खंडु शिंदे, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर कुंभार, निखील राजीवडे यांनी केली आहे.

