Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बीव्हीजी डेव्हलपर्सची 7 कोटींची फसवणूक:बिल्डर रायकर,सोमाणीसह चौघांवर गुन्हा दाखल

Date:

पुणे-नामांकित बीव्हीजी डेव्हलर्पसच्या नावाने बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर भागीदारांचे बनावट सह्या करुन, त्याद्वारे बीव्हीजी डेव्हलर्पस या भागीदारी संस्थेचे मंजूर मुदतकर्ज खात्यातून परस्पर वेगवेगळया फर्मच्या खात्यावर पैसे वळवून 6 काेटी 94 लाख 18 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विभीषण व्यंकटराव गायकवाड (वय- 53,रा.निगडी,पुणे) यांनी 4 आरोपींविराेधात भाेसरी पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार बांधकाम व्यवसायिक विजय अरविंद रायकर (वय-46,रा.सिंहगड राेड,पुणे), शाहबाज जफर सय्यद माेहमंद जफर (रा.गहुंजे, ता.मावळ,पुणे), बांधकाम व्यवसायिक गाैरव सुनिल साेमाणी (35,रा. बिबवेवाडी,पुणे) व महेश भगवनराव नलावडे या आराेपींवर भांदवि कलम 420, 409, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आ​​​​​​​ला आहे. सदरचा प्रकार 25/10/2019 ते 18/1/2020 दरम्यान घडला आ​​​​​​​हे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शाहबाज जफर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची औद्याेगिक वित्त शाखा पिंपरी येथे रिलेशनशिप मॅनेजर पदावर असताना, पदाचा गैरवापर करुन बांधकाम व्यवसायिक विजय रायकर, गाैरव साेमाणी व महेश नलावडे यांच्याशी संगनमत केले. बीव्हीजी डेव्हलर्पसचे नावाचे बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर तक्रारदार व त्यांचा भाऊ बाळासाहेब गायकवाड यांच्या बनावट सह्या केल्या.
त्याद्वारे त्यांचे बीव्हीजी डेव्हलर्पस या भागीदारी संस्थेचे मंजुर मुदतकर्ज खात्यातून वेळेावेळी रक्कम 6 काेटी 14 लाख 18 हजार रुपये तक्रारदार यांचे संमतीविना परस्पर आ​​​​​​​राेपी शाहबाज जफर, विजय रायकर व गाैरव साेमाणी यांचे फायद्याकरिता त्यांच्या वेगवेगळ्या फर्मच्या खातेवर परस्पर वळते केले. त्यांचा फसवणुकीचा उद्देश साध्य हाेण्यासाठी तक्रारदार यांचे कर्ज खात्याचे बनावट बँक स्टेटमेंट तयार करुन त्यावर बँकेचा शिक्का व सही करुन ते तक्रारदार यांना वेळाेवेळी सादर केले.
तसेच सदरचा गैरप्रकार तक्रारदार यांचे निर्दशनास आल्यानंतर फसवणुकीची रक्कम परत करण्याचे वेळाेवेळी आश्वासान आराेपींनी दिेले. त्यापैकी विजय रायकर या आ​​​​​​​राेपीने 3 काेटी 20 लाख रुपये तक्रारदार यांना परत केले. परंतु उर्वरित 6 काेटी 94 लाख 18 हजार रुपये संगनमताने अपहार करुन स्वत:चे फायद्याकरिता वापरुन सदर रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आ​​​​​​​ली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस सपकळ करत आ​​​​​​​हेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज घाटात तरुणीने तरुणाला लुटले

पुणे- इंस्टाग्रामवरील ओळखीमुळे एका 28 वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक...

आता विमान उड्डाणासाठी 15 मिनिटांच्या विलंबाचीही चौकशी होईल:कंपनीला कारण सांगावे लागेल; नियम तत्काळ बदलले

देशातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रथमच तांत्रिक त्रुटींच्या देखरेखीची संपूर्ण...

वनराजची पत्नी सोनाली सह बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर निवडणूक रणांगणात… पोलीस बंदोबस्तात ..

पुणे-स्वतःचा नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला...