शेजाऱ्यांनी बेरोजगारीमुळे हिणविल्याने अल्पवयीन मुलाची सटकली अन दारू पिऊन गाड्या फोडल्या..

Date:

पुणे-मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाने 10 ते 12 वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील महर्षीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेजारी राहणार्‍या लोकांनी त्याला कामाबद्दल हिणवल्यामुळे रागातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने दिली आहे. अल्पवयीन मुलाने दहशत निर्माण करण्यासाठी वाहन तोडफोड केली आहे.

महर्षीनगरमधील क्रिसेंट हायस्कूल समोर पार्क असलेला टेम्पो, मालवाहतूक टेम्पोसह 10 ते 12 वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले आहे.हा अल्पवयीन मुलगा आईसोबत राहत असून, तो कामधंदा करीत नाही. त्यामुळे आजूबाजूला राहणारे लोक त्याला सातत्याने हिणवत होते. त्याचा राग आल्यामुळे तणावातून त्याने मद्यपान केले. त्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याने दांडक्याच्या साह्याने वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविली.

अचानकपणे आलेल्या आवाजामुळे नागरिकांनी मैदानाकडे धाव घेतली. त्यावेळी अल्पवयीन मुलगा वाहने फोडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी धाव घेउन पंचनामा केला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले असून, याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...